Join us

केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:34 IST

एका मुलीलाही तिचे केस सोनेरी रंगाचे करायचे होते. ती तिच्या नेहमीच्या सलूनमध्ये गेली. पण केस कलर करण्याची हौस तिच्या जीवावर बेतली.

लोकांना आपल्या केसांना वेगळा लूक द्यायला नेहमीच आवडतो. काही लोक त्यांचे केस विविध रंगात रंगवतात, तर काही जण हटके हेअरकट करतात. अमेरिकेतील एका मुलीलाही तिचे केस सोनेरी रंगाचे करायचे होते. ती तिच्या नेहमीच्या सलूनमध्ये गेली. पण केस कलर करण्याची हौस तिच्या जीवावर बेतली. तरुणीसोबत भयंकर घडलं. केसांची झालेली अवस्था पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील १८ वर्षीय कायरी मार्टिनचं सोनेरी रंगाचे केस करण्याचा अनुभव आयुष्यातील सर्वात भयंकर अनुभव ठरला आहे. कायरी लूक बदलण्यासाठी खूप उत्सुक होती. कायरीने दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या चार वर्षांपासून सतत तिचे केस रंगवत होती आणि कधीही तिला कोणतीही समस्या आली नाही, परंतु यावेळी हेअर डाय तिच्यासाठी धोकादायक ठरलं. हेअरड्रेसरने फॉइल्स लावून केस रंगवायला सुरुवात केल्यानंतर एक तासानी तिच्या स्काल्पवर जळजळ होऊ लागली. पुढे असह्य वेदना सुरू झाल्या.

रडत रडत कायरीने हेअरड्रेसरला सांगितलं की तिचे डोकं तिला आगीत जळल्यासारखं वाटत आहे. हेअरड्रेसरने लगेचच फॉइल्स काढायला आणि तिचे केस धुण्यास सुरुवात केली. मग अचानक तिच्या केसांमधून धूर येत असल्याचं दिसलं. कायरी वेदनेने ओरडत सलूनमधून बाहेर पडली. घरी पोहोचल्यावर, तिच्या आईला तिच्या डोक्यावर एक मोठा लाल डाग आणि सूज दिसली आणि आईने तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं. चेकअपनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, कायरीच्या डोक्यावर केमिकल्सचा परिणाम झाला आहे.

काही दिवसांनी कायरीची प्रकृती खूप बिघडली, तेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांना तिच्या डोक्यावरून मृत त्वचेचा एक मोठा तुकडा काढून टाकावा लागला. यामुळे तिच्या डोक्यावर टक्कल पडलं असून जिथे केस आलेले नाहीत. तसेच कधीही येणार नसल्याची शक्यता आहे. कायरी म्हणाली की, बरं होण्याची प्रक्रिया खूप मोठी आणि वेदनादायक होती. जखम बरी होण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक काळ लागला आहे पण केस अद्याप आलेले नाहीत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया