गुगलवर कधी कोणता ट्रेण्ड येईल आणि लोकं तो कसा उचलून घेतील हे सांगताच येत नाही. आता मध्यंतरी झिबली ट्रेण्ड झाला. त्यानंतर हळदीचं पाणी गाजला आणि आता Google Gemini AI Saree Trend आला आहे. तुमचा कोणताही फोटो एआयला द्या. त्यावर प्रॉम्प्ट टाका. तुम्हाला तुमचा अगदी रेट्रो लूकमधला मस्त फोटो एका मिनिटांत मिळतो. यामध्ये तुम्ही अतिशय सुंदर साडी नेसलेली असते आणि केस मोकळे सोडून त्यात छानपैकी गजरा माळलेला असतो. सध्या महिला वर्गात या ट्रेण्डची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून जी ती स्वत:चा असा फोटो सोशल मीडियावर शेअर करते आहे. याविषयी अगदी मजेशीर प्रतिक्रिया शंतनू नायडू याने दिली आहे.(Shantanu Naidu reacts on Google Gemini AI Saree Trend)
शंतनूने या नव्या ट्रेण्डविषयी त्याचं मत सांगणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो म्हणतो की अरेरे तुम्ही लोक किती आळशी झालेल्या आहात. स्वत:चा एक फोटो एआयला द्यायचा आणि त्यातून स्वत:चा रेट्रो लूक तयार करून घ्यायचा म्हणजे किती हा आळशीपणा..
तांदळाच्या पिठाचा जाळीदार, कुरकुरीत इंस्टंट डोसा- नाश्त्यासाठी परफेक्ट मेन्यू, घ्या चवदार रेसिपी
तुम्ही भारतात राहता. अमेरिकेत नाही. तुमच्या कपाटात या क्षणी १५ साड्या तरी नक्कीच असतील. त्यापैकी एखादी साडी घ्या, ती नेसा आणि स्वत:चे सुंदर फोटो काढून घ्या.. हे तुमचे नॅचरल फोटो एआयने दिलेल्या इमेजेसपेक्षा कितीतरी जास्त देखणे असतील.. पण तेवढा वेळही तुम्ही देत नाही आहात. खरंच तुम्ही आळशी झाला आहात का?
शंतनूने विचारलेला हा प्रश्न खरोखरच रास्त आहे. साडी, मेकअपचं सामान, मोबाईलचा कॅमेरा सगळं अगदी आपल्या आसपास आहे. पण तरीही आपल्याला स्वत:चेच फोटो तयार करून घ्यायला कशाला हवंय एआय..
Drop Head Symdome: सारखं मोबाईल बघितल्यामुळे २५ वर्षाच्या तरुणाची मान कायमची वाकली, जडला नवाच आजार
शिवाय आता त्याच्या सुरक्षिततेविषयी जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, तेही आहेच.. त्यामुळे हा ट्रेण्ड जर वापरायचाच असेल तर जरा सांभाळून पावलं टाका, असंही तज्ज्ञ मंडळी सुचवत आहेत.