Join us  

रोबोटने म्हणे महिला पत्रकारसोबत केलं आक्षेपार्ह कृत्य? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2024 1:06 PM

Saudi Arabia's first male robot ‘harasses’ woman reporter on live TV; netizens call it 'pervert, womaniser' : सौदी अरेबियातील पुरूष रोबोटने महिला पत्रकारसोबत केलं असे काही की..

टेक्नोलॉजी जस जशी विकसित होत चालली, तस तशी विकासामध्ये वाढ आणि मानावाची कामे झटपट पूर्ण करण्यात मदत होत आहे. सुपरस्टार रजनीकांतचा 'रोबोट' (Robot) प्रत्येकाने पाहिला असेल. त्यात ज्याप्रमाणे रोबोट सगळी कामे झटक्यात आटोपतो, त्याचप्रमाणे रोबोट विविध कामे करण्यात तरबेज ठरत आहे. सौदी अरेबियाने नुकतंच आपला पहिला ह्यूमॅनॉईड रोबोट तयार केला आहे. या रोबोटला पाहण्यासाठी जगभरातील लोकं सौदी अरेबियाला जात आहेत.

मात्र, सध्या हा रोबोट वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे (Saudi Arabia). त्याने महिला पत्रकारासोबत असे काही कृत्य केले की, त्याला ट्रोल करण्यात येत आहे. नेटकरी 'मेन व्हील बी मेन' असं म्हणत या रोबोटची खिल्ली उडवत आहे (Soccial Viral). शिवाय महिला पत्रकारला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केल्याबद्दल संतापही व्यक्त करण्यात येत आहे(Saudi Arabia's first male robot ‘harasses’ woman reporter on live TV; netizens call it 'pervert, womaniser').

लडाखचे पारंपरिक सिल्क वापरुन सोनम कपूरने बनवला खास ड्रेस! घातले आई आणि सासूचे दागिने

रोबोटने महिला पत्रकारासह नक्की काय केलं?

४ मार्च रोजी सौदी अरेबियात एक रोबोट लॉन्च करण्यात आले.  व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोबोट एका महिला पत्रकाराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करत आहे असे दिसते. लॉन्चिंगनंतर एक महिला पत्रकार या रोबोटच्या बाजूला उभी राहून रिपोर्टिंग करत होती. त्यावेळी हा प्रकार घडला.

अंबानीच्या लेकाच्या लग्नात रिहाना करणार परफॉर्म; पण रिहाना नक्की आहे तरी कोण? तिची संपत्ती किती?

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

रोबोटने महिला पत्रकारला कशामुळे आणि कसे स्पर्श केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या रोबोटचे हे कृत्य पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहे. एकाने म्हटले की, 'हा रोबोट कोणत्या उद्देशाने बनवला आहे?' तर दुसऱ्याने 'हा रोबोट महिला पत्रकाराला अशा पद्धतीने स्पर्श करू शकतो का?' असे म्हणत प्रश्न उपस्थित केले आहे. तर एकाने 'मेन व्हील बी मेन' असे म्हणत त्याला ट्रोल केलं आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसौदी अरेबियासोशल मीडिया