Join us

Saree Clad Woman Glides On A Skate Board : कमाल! भर रस्त्यात साडी नेसून स्केटिंग करणाऱ्या तरूणीनं नेटिझन्सना लावलं वेड; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 22:20 IST

Saree Clad Woman Glides On A Skate Board :

तुम्ही कधी स्केटबोर्डिंगवर स्केटींग करण्याचा प्रयत्न केला आहे का? हे निश्चितपणे सोपं काम नाही. स्केटबोर्ड कोणत्याही चुकांशिवाय चालवण्यासाठी केवळ संयमाची गरज नाही, तर उत्तम समतोलही महत्वाचा असतो. सोशल मीडियावर साडी नेसून स्केटींग करत असलेल्या एका तरूणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लॅरिसाने साडी नेसून स्केटबोर्ड उत्तम प्रकारे चालवल्याचं दिसून येतंय. (Saree clad woman glides on a skate board in kerala so beautiful says internet)

 इंस्टाग्राम प्रोफाईलवर शेअर केलेल्या, व्हिडिओमध्ये स्केटबोर्डवर केरळमधील हिरव्यागार वाटेवरून लॅरिसा सरकताना दिसत आहे. लॅरिसाने पांढरी सुती साडी नेसली असून  केसांचा बन बांधून तिनं केसांभोवती गजरा गुंडाळला आहे.  तिच्या साडीचं आणि गोल्डन ब्लाऊजचं कॉम्बिनेशन  लक्ष वेधून घेत आहे. 

नवऱ्याच्या मित्रांनी नवरीकडून करारच सही करून घेतला; यावरच्या अटी वाचून जोरजोरात हसाल

तिची स्केटबोर्ड चालवण्याची अचूक पद्धत लोकांना थक्क करून सोडते. या क्लिपला १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. लोक लॅरीसाचे खूप कौतुक करत आहेत.  साडी नेसली की इतर काम करणं खूप अवघड वाटतं अशात साडी नेसून स्केटींग केल्यामुळे या तरूणीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया