Join us

...'त्याला' माझ्या आईच्या घरी येऊनच राहावं लागेल! सारा अली खानने केला स्वतः खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:12 IST

Sara ali khans future husband will have to live with her mother : मी आईला सोडून जाणार नाही, माझ्याशी ज्याला लग्न करायचं त्यानं.. सारा अली खानची अट

सारा अली खान सध्या तिच्या व्यावसायिक जीवनाचा आनंद घेत आहे. ती अलीकडेच धनुष आणि अक्षय कुमार सोबत अतरंगी रे मध्ये दिसली होती. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री सध्या कोणालाही डेट करत नाहीये. सारा अली खान ही ज्येष्ठ अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी आहे. सारा लहान असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि तेव्हापासून ती तिची आई अमृता सिंगसोबत राहते.

साराला इब्राहिम अली खान नावाचा एक लहान भाऊ देखील आहे, जो अजूनही फिल्मी जगापासून दूर आहे. साराचे तिची आई अमृता सिंगसोबत खूप जवळचे नाते आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला की तिला अशा व्यक्तीशी लग्न करायचे आहे जो तिच्या आईसोबत राहू शकेल.

सारा अली खानने 'ई-टाइम्स'ला तिच्या 'अतरंगी रे' चित्रपटाविषयी एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. यादरम्यान साराला मुलाखतीत विचारण्यात आले की, ती आईपासून दूर जाऊन स्वत: काही करण्याचा विचार करते का? यावर उत्तर देताना सारा म्हणाली की, ती तिच्या आईसोबत राहणार आहे आणि तिच्या आईसोबत राहणाऱ्या व्यक्तीशीच लग्नही करणार आहे.

यावेळी सारा  म्हणालीकू,  "बिल्कुल नहीं। मैं शादी भी किसी ऐसे व्यक्ति से करूंगी, जो मेरी मां के साथ रह सके। मैं उन्हें (अमृता) नहीं छोड़ने वाली हैं। मेरी मां बहुत उदार महिला हैं। रोजमर्रा की जिंदगी में वह मेरी तीसरी आंख हैं।” याआधी, 'टिंडर इंडिया'शी संवाद साधताना सारा अली खानने तिची आई अमृता तिला डेटिंगबाबत काय सल्ला देते हे शेअर केले होते.

सारा म्हणाली होती की, ''मला वाटते, माझे मित्र, आई आणि माझ्या आजूबाजूचे बहुतेक लोक एक गोष्ट सांगत असतात, ती म्हणजे तू कोण आहेस. दुसऱ्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलण्याची गरज नाही. जर तुम्ही इतर कोणामुळे तुमचे मत व्यक्त करू शकत नसाल तर त्यांच्यासोबत राहू नका." सारा अली खान तिच्या आईवर खूप प्रेम करते आणि तिच्या मतांचा आदर करणं, तिचा प्रत्येक बाबतीत सल्ला घेणं साराला आवडतं. 

टॅग्स :सारा अली खानसोशल व्हायरलरिलेशनशिप