Join us

'हा' गंभीर आजार झाल्याने समंथा प्रभूनं जंकफूडच्या जाहिरातींना दिला नकार, म्हणाली करोडाे रुपये....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 16:44 IST

Samantha Prabhu Stopped Doing Junk Food Ads: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभू मागच्या काही वर्षांपासून जंकफूडच्या जाहिराती करत नाहीये.. याबाबत बघा तिनेच केलेला हा खुलासा..(Samantha Ruth Prabhu reveals reason behind not doing junk food ads)

ठळक मुद्देतिच्यामध्ये असा अचानक बदल का झाला याविषयी तिने स्वत:च एका मुलाखतीद्वारे माहिती दिली आहे.

कोणत्या कलाकाराला किती जाहिराती मिळत आहेत, ते ज्या ब्रॅण्डच्या जाहिराती करतात तो ब्रॅण्ड किती मोठा आहे, यावरून तो स्टार किती मोठा आणि प्रसिद्ध आहे हे ठरवलं जात असतं. असाच ट्रेण्ड मागच्या काही वर्षांपासून जाहिरातींच्या जगात पाहायला मिळतो. अभिनेत्री समंथा प्रभू म्हणते की ती सुद्धा जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आली तेव्हाही हाच ट्रेण्ड होता. त्यामुळे आपल्याकडेही नामांकित, मल्टीनॅशनल ब्रॅण्डच्या जास्तीतजास्त जाहिराती याव्या असं तिला वाटायचं.. त्यानुसार तिने बऱ्याच जाहिराती करून बक्कळ पैसाही मिळवला. पण एका टप्प्यावर आल्यानंतर मात्र तिला हे सर्व खटकायला लागलं आणि तिने काही जाहिरातींना स्पष्टपणे नकार द्यायला सुरुवात केली..(Samantha prabhu stopped doing junk food ads) तिच्यामध्ये असा अचानक बदल का झाला याविषयी तिने स्वत:च एका मुलाखतीद्वारे माहिती दिली आहे.(Samantha Ruth Prabhu reveals reason behind not doing junk food ads)

 

समंथा प्रभूने जंकफूडच्या जाहिराती करणं का थांबवलं?

समंथाच्या एका मुलाखतीचा भाग foodpharmer and rethinkindiaofficia या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती म्हणते की तिला २०२२ साली Autoimmune हा आजार झाल्याचं निदर्शनास आला.

पोट नेहमीच गुबारलेलं असतं, गॅसेसचाही त्रास होतो? ५ सोपे उपाय- अपचनाचे सगळेच त्रास थांबतील

हा आजार एकदा झाला की तो शक्यतो आयुष्यभर त्या व्यक्तीची पाठ सोडत नाही. काही औषधांच्या माध्यमातून तो नियंत्रणात ठेवता येतो, पण शुगर, बीपी या आजारांप्रमाणे तो कायम त्या व्यक्तींच्या मागेच असतो. या आजारात आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती बॅक्टेरिया, व्हायरस यांच्या विरुद्ध लढण्याऐवजी आपल्या शरीरातील पेशींविरुद्धच लढू लागते. यामुळे मग वेगवेगळ्या भागात दुखणे, मळमळ, चक्कर येणे, डोकं दुखणे, थकवा, अशक्तपणा यासह इतर अनेक वेगवेगळे त्रास जाणवतात. समंथाला हाच आजार आहे.

 

तो आजार झाल्याचं जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आणि जंकफूडचं समर्थन करणाऱ्या जवळपास १५ माेठ्या ब्रॅण्डच्या जाहिरातींना नकार दिला.

केस, त्वचा तर छान होईलच, तब्येतही सुधारेल- १ पैसाही खर्च न करता १ मिनिटांत करा जादुई उपाय

समंथा म्हणजे जेव्हा अशा कोणत्याही जाहिरातींबाबत माझ्याकडे विचारणा केली जाते तेव्हा ती कमीतकमी ३ डॉक्टरांचा सल्ला घेते आणि त्यावरून त्या उत्पादनाची जाहिरात करायची की नाही हे ठरवते.. समंथा म्हणते यामुळे माझं आतापर्यंत करोडाेंचं नुकसान झालेलं आहे. पण तरीही या जाहिराती करणं तिने पुर्णपणे थांबवलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसमांथा अक्कीनेनीआरोग्यजंक फूडजाहिरात