Join us

Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:25 IST

एका रशियन महिलेने तिच्या घरी काम करणाऱ्या हाऊस हेल्पला म्हणजेच मेडला महिन्याला तब्बल ४५ हजार पगार दिला आहे.

बंगळूरूमधील एका घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका रशियन महिलेने तिच्या घरी काम करणाऱ्या हाऊस हेल्पला म्हणजेच मेडला महिन्याला तब्बल ४५ हजार पगार दिला आहे. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. बंगळूरूमध्ये राहणाऱ्या रशियन महिलेने एका व्हायरल पोस्टमध्ये तिच्या मेडला देण्यात येणाऱ्या पगाराबाबत मोठा खुलासा केला. ही रक्कम ऐकून युजर्सनी या पगाराची तुलना TCS आणि Infosys या देशातील प्रमुख आयटी कंपनीतील फ्रेशर्सच्या पगाराशी केली आहे.

ही गोष्ट फक्त उच्च पगाराबद्दल नाही तर माणुसकीबद्दल देखील आहे. यूलिया असलमोवा असं या महिलेचं नाव आहे, ती एक कंटेंट क्रिएटर आणि प्रोफेशनल आहे. तिने तिच्या घरकामात मदत करण्यासाठी केवळ एक मेड ठेवली नाही तर तिला आदर, व्यावसायिक प्रशिक्षण आणि करिअर वाढीसाठी संधी देखील दिली. युलियाचा असा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या नोकरीचा आदर केला पाहिजे, मग ती कोणत्याही पदावर असो.

युलिया म्हणते की, ज्याप्रमाणे कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी केपीआय असतात, त्याचप्रमाणे तिने तिच्या मेडसाठी एक प्रणाली तयार केली जेणेकरून तिला समजेल की तिचे परिश्रम आणि सुधारणाची व्हॅल्यू आहे. जेव्हा तिने तिच्या मुलीसाठी एलिनासाठी मेड शोधण्यास सुरुवात केली तेव्हा तिने घाई केली नाही. युलियाने सुमारे २० महिलांच्या मुलाखती घेतल्या आणि तिच्या मुलांप्रती मानसिकदृष्ट्या मजबूत, प्रामाणिक आणि जबाबदार कोण आहे हे ठरवण्यासाठी एक चेकलिस्ट तयार केली.

युलियाला फक्त पार्ट टाईम मदतीची आवश्यकता होती, परंतु तिला वाटलं की जर तिला एक चांगली व्यक्ती सापडली तर तिने तिला चांगला पगार द्यावा. पहिल्या वर्षानंतर, तिने तिच्या मेडला तिच्या कामगिरीच्या आधारावर १० टक्के पगार वाढ दिली. दुसऱ्या वर्षी, तिने KPI प्रणाली सुरू केली, ज्यामुळे कामगिरीवर आधारित जास्त कमाईचा मार्ग मोकळा झाला. तिसऱ्या वर्षी, तिने तिच्या मोलकरणीला पगाराच्या १.७ पट, फुल टाईम नोकरी, प्रशिक्षण आणि नवीन कौशल्ये शिकण्याच्या संधी दिल्या. आता ती तिला गाडी चालवायला शिकवत आहे.

युलियाने तिच्या कॅप्शनमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा देखील मांडला. भारतात फारसे लोक त्यांच्या मेडला आदराने वागत नाहीत. ती म्हणते की जर तुम्ही एखाद्याला आदर, संधी आणि न्याय दिला तर ते तुमच्याशी एकनिष्ठ राहतील. तुम्ही स्वतःच्या नोकऱ्यांबद्दल ज्याप्रमाणे विचार करता तसाच इतरांच्या नोकऱ्यांबद्दल विचार करा असा संदेश देखील तिने सर्वांना दिला आहे.

टॅग्स :सोशल मीडिया