Join us

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात दणक्यात नाचले धोनी आणि रैना! साक्षी पंत कोण, कुणाशी केले लग्न..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:08 IST

Rishabh Pant's sister's wedding : मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. यावेळी ऋषभनं बहीण आणि होणाऱ्या भावोजीसोबत रंगही खेळला.

Rishabh Pant's sister's wedding :  भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत याची मोठी बहीण साक्षीचं बुधवारी म्हणजेच मसूरीमधील सेवाय हॉटेलमध्ये अंकित चौधरी याच्यासोबत लग्न होणार आहे. लग्नाचे रितीरिवाज कालपासूनच सुरू झाले. मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. यावेळी ऋषभनं बहीण आणि होणाऱ्या भावोजीसोबत रंगही खेळला.

९ वर्षापासून एकमेकांना ओळखतात

मीडिया रिपोर्टनुसार, साक्षी आणि तिचा होणारा पती एकमेकांना गेल्या ९ वर्षापासून ओळखतात. आता हे कपल लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ऋषभची बहीण साक्षीचा होणारा पती अंकित चौधरी लंडनमध्ये बिझनेसमॅन आहे. साक्षी पंत आणि अंकित चौधरी यांचा साखरपुडा गेल्यावर्षी लंडनमध्ये झाला होता. साक्षीचं शिक्षण यूकेमध्येच झालं असून ती सोशल मीडियावर चांगलीच फेमस आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. लग्नाचे सगळे कार्यक्रम मसूरीमध्ये होणार आहेत. या लग्न सोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारातील लोकांना बोलवण्यात आलं आहे. 

धोनी-साक्षीही पोहोचले

ऋषभ पंतच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी पत्नी साक्षीसह मसूरीला पोहोचला. त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच आयसीसीचे अध्यक्ष जय शाहसहीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि टीममधील इतरही खेळाडू सुद्धा लग्नाला पोहचणार असल्याची चर्चा आहे.

संगीत आणि मेहंदीच्या सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी ऋषभ पंत रंग खेळताना दिसत आहे. आसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋषभ पंत बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईहून सोमवारी सायंकाळी मसूरीमध्ये पोहोचला होता.

टॅग्स :रिषभ पंतलग्नसोशल व्हायरल