सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. काही भागात तर अगदी मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. पावसाळा हा ऋतू सगळ्यांना आवडणारा, मन प्रसन्न करणारा असला तरी देखील, तो येताना आपल्यासोबतच अनेक समस्या देखील सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा आनंद घेताना त्याच पाण्यापासून घराची देखभाल करणे देखील तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यात अनेकदा आपल्या घराचे छत गळते, भितींमधून (Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips) पाणी झिरपते, ओलाव्याने भिंती खराब होतात, भिंतींना बुरशी लागते, भिंतींवर ओलसर डाग दिसू लागतात. पावसाळ्यात दरवर्षी होणारी छताची गळती ही केवळ डोकेदुखी नसून, घराच्या (How to Fix Leaky Roofs for Monsoon) सुरक्षिततेसाठीही धोका निर्माण करू शकते. पावसाळा सुरु झाला की घरातील छत गळायला लागल्याची तक्रार आपल्यापैकी बरेचजण करतात(How to Save Your Roof From Water Leaks).
पावसाळ्यात अशा प्रकारच्या छत गळतीच्या समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा, वेळेत उपाययोजना करणं अधिक शहाणपणाचं ठरतं. पावसाळ्याच्या अगोदर काही सोप्या उपायांनी छत मजबूत आणि जलरोधक करता येऊ शकतं. पावसाळ्यात अशा सगळ्या समस्या येऊ नये आणि गळणारे घर आपल्याला वेळीच सावरता यावे यासाठी आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. जेणेकरुन आपली ऐनवेळी धांदल होणार नाही आणि घरभर पाणी - पाणी देखील होणार नाही, पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे.
पावसाळ्यात घराचे छत आणि भिंतींची अशी घ्या काळजी...
१. छताचा स्लोप योग्य पद्धतीने आहे का ते तपासा :- घराच्या छतावर किंवा भिंतींवर येणाऱ्या ओलसरपणामागे सर्वात मोठं कारण म्हणजे छताचा योग्य स्लोप नसणं. छताचं बांधकाम करताना अनेकवेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात, आणि काम लवकर पूर्ण करण्याच्या घाईत घराच्या छताला योग्य पद्धतीने स्लोप दिला जात नाही. परिणामी, पावसाळ्यात पाणी साचून गळती किंवा ओलसरपणा निर्माण होतो. त्यामुळेच, पावसाळा सुरू होण्यापूर्वी छताचा स्लोप योग्य आहे का, याची तपासणी करून त्यात आवश्यक ते बदल करावेत.
२. साचलेल्या पाण्याचा निचरा व्यवस्थित करा :- पावसाळ्यात घरात ओलसरपणा येण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न होणं. जर पाणी वेळेवर वाहून गेलं नाही, तर ते छतावर किंवा भिंतींवर साचून गळती निर्माण होऊ शकते. त्यामुळे छतावर लावलेल्या ड्रेनेज पाइप्स, तसेच बाथरूम व स्वयंपाकघरातील पाणी वाहून नेणाऱ्या पाईप लाईन्स नियमित स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा सुरळीत होईल आणि पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणार नाही.
घराच्या कानाकोपऱ्यातील झुरळांमुळे हैराण? करा १ घरगुती उपाय, झुरळं घरात फिरकणार देखील नाहीत...
३. भिंतींवरील भेगा - तडे दुरुस्त करा :- पावसाळ्यामध्ये होणाऱ्या सततच्या किंवा जोरदार पावसामुळे भिंतींवर ओलसरपणा येण्याची शक्यता वाढते. विशेषतः छतावर पाणी साचत असेल किंवा टपकत असेल, तर वेळीच योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक ठरते. जर छतावर किंवा भिंतींवर कुठेही भेगा किंवा तडे पडलेले असतील, तर त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. शक्य असल्यास त्या भागावर कायमस्वरूपी प्लास्टर करून घ्यावे. जर ते शक्य नसेल, तर सीमेंट प्लास्टर लावूनही तात्पुरता उपाय करता येतो. वेळेवर दुरुस्ती केल्यास पावसामुळे होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून घराचे संरक्षण करता येते.
घरभर उंदरांचा उच्छाद? करा कणकेच्या पिठाचा सोपा घरगुती उपाय - उंदीर पळतील घराबाहेर...
४. घराच्या कोपऱ्यांची नीट तपासणी करा :- जर तुमच्या घराच्या छतावरून पाणी वारंवार गळत असेल, तर यामुळे संपूर्ण घरात ओलसरपणा वाढू शकतो. या ओलसरपणामुळे घराच्या भिंतींमधील ओलावा वाढून त्यांना बुरशी देखील येऊ शकते. यासाठीच, पावसाळा सुरू होण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्याची काळजीपूर्वक तपासणी करणे गरजेचे आहे. कुठल्याही कोपऱ्यातून पाणी झिरपत असल्याचे आढळल्यास, त्या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. अशा साध्या पण सोप्या उपायांनी आपण पावसाळ्यात घरात येणाऱ्या ओलसरपणाच्या समस्येपासून बचाव करू शकता.