नवी पिढी जुन्या पिढीतील आजी-आजोबांच्या जोड्यांना टॉक्सिक कपल किंवा जबरदस्ती एकत्र आयुष्य काढणारी जोडपी या दृष्टीकोनातून बघते. महिलांसाठी तर या जोडप्यांमध्ये स्त्रियांना कधी किंमतच मिळाली नाही अशा टिकाही केल्या जातात. (relationship tips, Tere Pyaar Mein Sara Alam Kho Bhaite! Viral video of aged couple, his love for his wife is priceless )अशा तीन पिढ्यांमधील मतभेदांच्या चर्चा तुमच्या घरातही होत असतीलच. मुळात पिढीनुसार विचार, आजूबाजूचे वातावरण, वागणूक आणि भूमिका बदलत जातात. प्रत्येक पिढीकडून काही तरी शिकण्यासारखे आहेच. दोन वर्षाच्या रिलेशनशिपला कंटाळणाऱ्या आजच्या कपल्ससाठी जुन्या पिढीतील ५०- ६० वर्ष एकत्र संसार करणारे आजी-आजोबा नक्कीच आदर्श असायला हवेत.
सध्या असाच एक आजी-आजोबांचा व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. एका बागेत काही कॉलेजात जाणाऱ्या मुलांचा ग्रुप छान गाणी म्हणत बसला होता. तिथूनच बाजूने फिरायला जाणाऱ्या आजी-आजोबांच्या कानावर गाण्याचे बोल पडले. मुलांच्या गाण्याचा आवाज ऐकून आजोबांनी 'कौन चार लोग?' असा विचार करुन गाण्याच्या बोलांवर मनमोकळेपणाने नाचायला सुरवात केली. आजोबांनी तर अगदी अमिताभ बच्चन स्टाईल कपल डान्स करायला आजीलाही जवळ ओढले. आजींनीही लाजत लाजत साथ दिलीच. हा व्हिडिओ फक्त मज्जा म्हणून नाही तर लोकांनी फार सकारात्मकता देणार म्हणून व्हायरल केला.
आजोबांना कळलेही नाही त्यांच्या काही सेकंदांच्या डान्समुळे अनेकांना महत्त्वाचा संदेश मिळाला. केस पिकले, पाठ वाकली, गुडघे बोलायला लागले तरी बायको प्रतिचे प्रेम कमी होऊ दिले नाही. दोघांनी कितीतरी अडचणी , मतभेद, मनभेद, भांडणं, रुसवे-फुगवे पाहीले असतील मात्र त्यांनी साथ सोडली नाही. 'कमिटमेंट' या शब्दाचा खरा अर्थ हाच. एकदा प्रेम केल्यावर ते शेवटपर्यंत नेता आले पाहिजे.
अगदी शुल्लक कारणांवरुन आजकाल ब्रेकअप्स, घटस्फोट होतात. प्रेमाचे रुपांतर वासनेत व्हायला लागले आहे. सिट्युएशनशिप, वन नाईट स्टॅण्ड, फ्रेंण्ड्स विथ बेनिफिट्स सारं काही फक्त शारीरिक संबंधांसाठीच. त्यामुळेच तरुणांना आजकाल सतत ताणतणाव, एग्झायटी, टेंशन, स्ट्रेस, नैराश्य येते. कारण नात्यात सारे फक्त प्रेम नाही. या आजी-आजोबांनी नकळत फार काही शिकवले. प्रेम कसे असावे ? तर असे असावे. एकदा हात पकडला की तो शेवटपर्यंत तसाच असावा.