Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाल माठ चांगला की काळा माठ चांगला? व्हायरल व्हिडिओत आता माठाचीही चर्चा, गार पाण्यासाठीही स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:07 IST

Viral Video : अनेकांना असा प्रश्न पडतो की, लाल मडकी जास्त चांगली असतात की काळी? या प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 

Viral Video : उन्हाळा आला की, लोक घरात झाकून, बांधून ठेवलेले मातीचे मडके पुन्हा वापरण्यासाठी काढतात. तर काही लोक गारेगार पाण्यासाठी दरवर्षी नवीन मातीची मडकी विकत आणतात. अंगाची लाही लाही करणाऱ्या गरमीत मातीच्या मडक्यातील गार पाणी वेगळाच आनंद देऊन जातं. एक ग्लास पाणी पोटात जाताच तृप्तीचा आनंद मिळतो. सोबतच मडक्यातील पाण्याचा एक वेगळाच सुगंध येतो आणि टेस्टही वेगळी लागते. या पाण्याचे शरीराला अनेक फायदेही होतात. फ्रीजमधील थंड पाणी शरीराचं नुकसान करतं, त्यामुळे मातीच्या मडक्यातील गार पाणी कधीही चांगला पर्याय ठरतं. आपण पाहिलं असेल की, बाजारात लाल आणि काळ्या रंगाची मडकी मिळतात. अनेकांना असा प्रश्न पडतो की, लाल मडकी जास्त चांगली असतात की काळी? या प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 

व्हिडिओत काय सांगितलं? 

व्हिडिओत व्यक्ती सांगत आहे की, लाल मडक्यातील पाणी जास्त फायदेशीर असतं की, काळ्या मडक्यातील? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यानंतर ही व्यक्ती दोन्ही मडक्यांचे फायदे सांगते. तो सांगतो की, 'लाल मडकी नॉर्मल मातीपासून बनवली जातात, ही मडकी आगीत भाजली जातात. जर आपल्या शरीरात आयर्न कमी असेल तर लाल मडक्यातील पाणी फायदेशीर ठरतं. कारण यात आयर्नचं प्रमाण अधिक असतं'. पुढे तो सांगतो की, 'काळी मडकी ही खास पद्धतीने राख आणि धुरात तयार केली जातात. त्यामुळे यातील पाण्यात बॅक्टेरिया राहत नाहीत. जर आपल्याला गॅसची समस्या असेल तर आपल्यासाठी काळ्या मडक्यातील पाणी बेस्ट ठरेल, कारण याचा pH 8-8.5 असतो'.

व्हिडिओच्या शेवटी तो सांगतो की, लाल मडक्यात पाणी लवकर थंड होतं, पण काळ्या मडक्यात पाणी जास्त वेळ थंड राहतं. असं पाहायला गेलं तर काळी मडकी लाल मडक्याच्या तुलनेत जास्त चांगली असतात. हा व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @rastrvadi_4 नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय. आतापर्यंत हा व्हिडीओ बऱ्याच लोकांनी बघितलाय. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Red or black earthen pot: Which is more beneficial?

Web Summary : A viral video explains the benefits of red and black earthen pots. Red pots are good for iron deficiency, while black pots help with gas issues due to their pH level. Black pots keep water cooler longer.
टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरल