Lokmat Sakhi >Social Viral > काही जणांनाच खूप डास चावतात असं का? पावसाळा होईल सुसह्य, पाहा डासांच्या त्रासावर उपाय

काही जणांनाच खूप डास चावतात असं का? पावसाळा होईल सुसह्य, पाहा डासांच्या त्रासावर उपाय

Mosquito Bites Causes : असे बरेच लोक असतात ज्यांना वाटतं की, इतरांच्या तुलनेत त्यांना जास्त डास चावतात. पण हा काही भ्रम नाहीये. हे सत्य आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:54 IST2025-06-03T12:07:46+5:302025-06-03T19:54:35+5:30

Mosquito Bites Causes : असे बरेच लोक असतात ज्यांना वाटतं की, इतरांच्या तुलनेत त्यांना जास्त डास चावतात. पण हा काही भ्रम नाहीये. हे सत्य आहे.

Reasons why are mosquitoes attracted to you more than other people | काही जणांनाच खूप डास चावतात असं का? पावसाळा होईल सुसह्य, पाहा डासांच्या त्रासावर उपाय

काही जणांनाच खूप डास चावतात असं का? पावसाळा होईल सुसह्य, पाहा डासांच्या त्रासावर उपाय

Mosquito Bites Causes : देशात बऱ्याच भागांमध्ये पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे घराघरांमधील लोक डासांमुळे हैराण झाले आहेत. या दिवसांमध्ये डासांची समस्या खूप वाढते. डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया, जीका वायरस आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. अशात बरेच लोक डासांना पळवून लावण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. 

असे बरेच लोक असतात ज्यांना वाटतं की, इतरांच्या तुलनेत त्यांना जास्त डास चावतात. पण हा काही भ्रम नाहीये. हे सत्य आहे. अशी बरीच कारणं असतात ज्यामुळे काही लोकांना डास जास्त चावतात. ज्याबाबत अनेकांना काहीच माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काही लोकांना डास जास्त का चावतात याची 6 कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच डासांपासून बचाव करण्याचे काही उपायही सांगणार आहोत.

डास व्यक्तीला कसे शोधतात?

एक डास त्याचं पोट भरतेवेळी वेगवेगळे संकेत फॉलो करतो. हे संकेत डासांना सांगतात की, व्यक्ती जवळच आहे. या संकेतांमध्ये कार्बन डायऑक्साइड, त्वचेची दुर्गंधी आणि शरीराचं तापमान यांचा समावेश असतो.

कशामुळे तुम्हाला जास्त चावतात डास?

काही ठराविक लोकांना डास अधिक का चावतात याबाबत medicinenet वर एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात तुम्हाला डास अधिक चावण्याची कारणं सांगण्यात आली आहेत.

शरीराचा आकार

मुळात हे कारण जरा विचित्र वाटू शकतं. पण अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, डास सामान्यपणे शरीराचा आकार जास्त असलेल्या लोकांकडे अधिक आकर्षित होतात. असं होतं कारण त्यांच्या शरीरात अधिक रक्त असतं आणि ते जास्त उष्णता निर्माण करतात.

बॉडी हीट

सामान्यपणे डास दमट, ओलावा असलेल्या ठिकाणांवर अधिक वाढतात. अशात मनुष्यांच्या शरीराचं तापमान त्यांना आकर्षित करतं. काही केसेमध्ये तुम्ही घालत असलेल्या कपड्यांमुळेही तुम्हाला डास चावू शकतात. कारण या कपड्यांमुळे शरीराचं तापमान कायम राहतं.

स्किन बॅक्टेरिया

त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे सुद्धा तुम्हाला अधिक डास चावतात. कारण यांच्यामुळे येणारा गंधाकडे डास अधिक आकर्षित होतात. 

ब्लड टाईप

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना इतर ब्लड ग्रुपच्या लोकांच्या तुलनेत अधिक डास चावतात. हे का होतं याचं कारण अजून समोर आलेलं नाही.

प्रेग्नेन्सी

गर्भावस्थे दरम्यान महिलांमध्ये ब्लड व्हॉल्यूम आणि मेटाबॉलिज्म रेट अधिक असतो. त्यामुळे गर्भवती महिलांना डास अधिक चावण्याचा धोका असतो.

डासांपासून बचाव कसा कराल?

कापरा धूर

जर तुम्हालाही डासांच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही कापराचा वापर करू शकता. 2 ते 3 कापराच्या वड्या जाळून रूममध्ये ठेवा. यानंतर रूम थोडावेळ बंद ठेवा. जेव्हा कापूर पूर्णपणे जळेल तेव्हा रूमचा दरवाजा उघडा. कापराच्या सुगंधाने डास तुमच्या रूममधून बाहेर पडतील.

कडूलिंबाच्या पानांचा धूर

कडूलिंब हा एक चांगला आयुर्वेदिक उपाय मानला जातो. जर तुमच्या घरात डासांनी हल्ला केला असेल तर तुम्ही कडूलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करू शकता. ही पाने जळू नये त्यांना थोडं पेटवून धूर करा. त्यातून केवळ धूर निघावा. बघता बघता घरातील सगळे डास काही वेळात बाहेर पडतील. 

लसणाची पेस्ट

लसणाचा सुगंध जरा उग्र असतो. त्यामुळे हा सुगंध डास सहन करू शकत नाहीत. सामान्यपणे जिथे लसूण ठेवलेलं असतं तिथे डास येत नाहीत. जर तुमच्या घरात जास्त डास झाले असतील तर लसणाची पेस्ट तयार करा. रूममधील काही कोपऱ्यात ती ठेवा. डास लगेच पळतील.

पुदीन्याचा रस

तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.

Web Title: Reasons why are mosquitoes attracted to you more than other people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.