सणावाराचे दिवस आले की घरासमोर आपण अगदी हौशीने मोठमोठाल्या रांगोळ्या काढताे. हल्ली तर रंगाच्या रांगोळ्या काढण्यापेक्षा वेगवेगळ्या रंगाची फुलं वापरून गालिचा रांगोळ्या काढण्याचा ट्रेण्ड आहे. गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांच्यादरम्यान बाजारात झेंडू, शेवंती अशी वेगवेगळी फुलंही भरपूर प्रमाणात आलेली असतात. म्हणूनच त्या फुलांच्या पाकळ्या वापरून आपण मोठमोठाल्या रांगोळ्या काढतो. अगदी घरातही वेगवेगळ्या ठिकाणी किंवा देवाच्या पुजेसमोर फुलांच्या पाकळ्या वापरून सजावट करण्यात येते. पण फुलांच्या पाकळ्यांमध्ये पिवळा, केशरी आणि गुलाबाचा गुलाबी तसेच पांढरा हे रंगच जास्त असतात (How To Colour White Petals Of Flower For Rangoli). आता या चार रंगांशिवाय तुम्हाला वेगळ्या रंगाच्या पाकळ्या तुमच्या रांगोळीमध्ये हव्या असतील तर पाकळ्यांना आपल्या आवडीचा रंग देण्याची ही ट्रिक पाहून घ्या.(how to give different colours to white petals of flower?)
पांढऱ्या पाकळ्यांना वेगवेगळे रंग कसे द्यावे?
पांढऱ्या पाकळ्यांना वेगवेगळ्या रंगामध्ये रंगविण्यासाठी काय उपाय करता येतील याची माहिती prasad_rangavali या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी सुचविलेले उपाय पुढील प्रमाणे...
केस कमकुवत असतील तर तुटणारच, फक्त करा ४ गाेष्टी-केसांना मिळते भरपूर पोषण
१. पहिला उपाय म्हणजे फुलांच्या पांढऱ्या पाकळ्या एका भांड्यामध्ये घ्या. त्या भांड्यामध्ये आपण खाण्यासाठी म्हणजेच जिलेबी, आईस्क्रिम, नारळीभात असे वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी जे फूड कलर वापरतो ते घाला आणि सगळ्या पाकळ्या अलगदपणे हलवून व्यवस्थित एकत्र करून घ्या. तुम्ही ज्या रंगामध्ये पाकळ्यांना रंगवाल तो रंग अगदी चटकन पाकळ्यांना मिळेल.
२. जर तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात खाण्याचे रंग नसतील तर रांगोळीचे वेगवेगळे रंग वापरूनही तुम्ही पांढऱ्या पाकळ्यांना हवा तो रंग देऊ शकता. यासाठी पांढऱ्या पाकळ्या एका भांड्यात घाला.
तुमच्या घराला Dust Free करायचंय? 'या' पद्धतीने घर पुसा! मुंग्या, झुरळं, चिलटंही होतील गायब
त्या भांड्यात तुम्हाला त्या पाकळ्या ज्या रंगामध्ये रंगवायच्या असतील तो रंग घाला. यानंतर त्यावर थोडंसं तेल किंवा पाणी शिंपडा आणि अलगदपणे पाकळ्या हलवून घ्या. पांढऱ्या पाकळ्यांना छान रंग येईल. हा उपाय केल्याने तुमची रांगाळी आणखी जास्त उठावदार आणि इतरांपेक्षा वेगळी दिसेल हे नक्की.