Join us  

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2023 6:34 PM

Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri : ''अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिकाच्या जागी तृप्तीला घ्यायला हवे होते'', नेटकऱ्यांना आवडला तृप्तीचा बोल्डनेस..

दमदार अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुचर्चित 'अ‍ॅनिमल' (Animal) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, या चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीरसोबत मुख्य भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), अनिल कपूर (Anil kapoor) यासह कसलेले कलाकार पाहायला मिळाले. मुख्य म्हणजे अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) विलेनची भूमिका साकारून या चित्रपटाला चार चांद लावले.

या कलाकारांसोबत आणखी एका अभिनेत्रीची चर्चा सध्या सोशल मिडीयावर तुफान होत आहे. तृप्ती डिमरी (Tripti Dimeri) या अभिनेत्रीचा रोल छोटा होता, पण रणबीरसोबतच्या इंटिमेट सीन आणि उत्तम केमिस्ट्रीमुळे ती प्रकाशझोतात आली. पण ती अभिनेत्री नक्की कोण? तिचा छोटा रोल लोकांना का भावला? पाहूयात(Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri).

रणबीर आणि तृप्तीची केमिस्ट्री आवडली प्रेक्षकांना

बहुप्रतीक्षित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीरसह मुख्य भूमिकेत राश्मिका दिसली. तिने या चित्रपटात आपल्या रोलला पुरेपूर न्याय दिला. पण तिच्यापेक्षा तृप्ती डिमरीची चर्चा सोशल मीडियात होत आहे. तिची रणबीरसोबत असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. शिवाय राश्मिकाच्या जागी तृप्तीने मुख्य भूमिकेत काम करायला हवे होते, अशी इच्छा प्रेक्षकांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केली.

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

तृप्तीचा सिनेमॅटिक प्रवास

तृप्तीने २०१७ साली श्रेयस तळपदे अभिनित 'पोस्टर बोईज' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. पण तिला खरी ओळख दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'लैला-मजनू' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. शिवाय तिच्या अभिनयाचे कौतुकही करण्यात आले होते.

ओटीटी विश्वातही दाखवला जलवा

तृप्तीने फक्त सिनेविश्वात नसून, ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये देखील कमालीची भूमिका साकारली आहे. तिने बुलबुल आणि काला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवून दिलं.

सासूबाईंनी अंकितालाच धरले दोषी! सेलिब्रिटी असली तरी सासूरवास आहेच- अंकिता लोखंडेची गोष्ट काय सांगते?

पर्सनल लाईफमुळेही होती चर्चेत

तृप्ती मुळची उत्तराखंडची, कामानिमित्त आता ती मुंबईत स्थायिक झाली. ती अनेक कारणांमुळे सोशल मीडियात चर्चेत राहिली. ती काही वर्षांपूर्वी अनुष्का शर्मा यांचा भाऊ निर्माता कर्णेश शर्माला डेट करत होती. दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. पण हे जोडपं आपल्या फोटोंमधून हिंट्स देत होते. तिने कर्णेश शर्माच्या 'बुलबुल' आणि 'कला' या दोन सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. पण काही कालावधीनंतर त्यांनी एकमेकांसोबत ब्रेकअप केलं. तृप्तीने कथित बॉयफ्रेंड कर्णेशसोबतचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले.

लवकरच विकीसोबत करणार स्क्रीन शेअर

'अ‍ॅनिमल' या चित्रपटामधून मिळालेल्या घवघवीत प्रसिद्धीनंतर, तृप्ती लवकरचं, विकी कौशलसह 'मेरे मेहबूब मेरे सनम' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरसोशल मीडियासोशल व्हायरलरश्मिका मंदानाअनिल कपूरबॉबी देओल