Join us

Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:34 IST

एका राखी विक्रेत्याचा हा व्हिडीओ नेटिझन्सचे डोळे उघडत आहे.

रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकरच्या आकर्षक राख्या उपलब्ध आहेत. पण जेव्हा आनंदाने आपण सुंदर राखी खरेदी करतो तेव्हा त्याची खरी किंमत काय असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधून हे धक्कादायक सत्य उघड झालं आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या बाजारातील एका राखी विक्रेत्याचा हा व्हिडीओ नेटिझन्सचे डोळे उघडत आहे. व्हिडिओमध्ये, दुकानदार स्वतः एका कंटेंट क्रिएटरला सांगत आहे की, पॅकेजिंगचा खेळ करून २ रुपयांची साधी राखी १०, ५० आणि अगदी १०० रुपयांना कशी विकता येते.

व्हिडिओमध्ये, दुकानदार विविध प्रकारच्या पॅकेजिंगसह राख्या दाखवतो. यानंतर, ती व्यक्ती स्पष्ट करते की, साध्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये २ रुपयांची राखी कशी १० रुपयांना मिळते आणि त्याहूनही अधिक फॅन्सी बॉक्समध्ये तीच राखी ५० रुपयांच्या किमतीत आणि १०० रुपयांच्या वर विकली जाऊ शकते. दुकानदाराच्या मते, ग्राहकांना जितके आकर्षक पॅकेजिंग दिसेल तितके ते पैसे देण्यास तयार असतात.

@jasveersinghvlogs इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स त्यावर विविध कमेंट करत आहेत. काही लोकांनी ग्राहकांची अशाप्रकारे होत असलेल्या लूटमारीवर नाराजी व्यक्त केली आहे.

एका युजरने हा व्यवसाय नाही तर चालूगिरी आहे असं म्हटलं. तर दुसऱ्याने याचा अर्थ पॅकेजिंग हा राजा आहे असं सांगितलं.सध्या हे रील सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत असून जोरदार व्हायरल होत आहे. 

टॅग्स :रक्षाबंधनसोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओसोशल मीडिया