lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > हृदयस्पर्शी! भरकटलेले हत्तीचे पिल्लू पुन्हा विसावले आईच्या कुशीत, शोधकार्य टीमचे कौतुक-व्हिडिओ व्हायरल

हृदयस्पर्शी! भरकटलेले हत्तीचे पिल्लू पुन्हा विसावले आईच्या कुशीत, शोधकार्य टीमचे कौतुक-व्हिडिओ व्हायरल

Pollachi Foresters Rescue Baby Elephant, Mother Raises Her Trunk To 'Thank' — Video Goes Viral : आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी व्हिडिओ केला शेअर; आनंद महिंद्रा म्हणाले यावर शॉर्ट फिल्म बनवा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2024 02:57 PM2024-02-25T14:57:29+5:302024-02-25T14:58:35+5:30

Pollachi Foresters Rescue Baby Elephant, Mother Raises Her Trunk To 'Thank' — Video Goes Viral : आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी व्हिडिओ केला शेअर; आनंद महिंद्रा म्हणाले यावर शॉर्ट फिल्म बनवा कारण..

Pollachi Foresters Rescue Baby Elephant, Mother Raises Her Trunk To 'Thank' — Video Goes Viral | हृदयस्पर्शी! भरकटलेले हत्तीचे पिल्लू पुन्हा विसावले आईच्या कुशीत, शोधकार्य टीमचे कौतुक-व्हिडिओ व्हायरल

हृदयस्पर्शी! भरकटलेले हत्तीचे पिल्लू पुन्हा विसावले आईच्या कुशीत, शोधकार्य टीमचे कौतुक-व्हिडिओ व्हायरल

प्रत्येक आईसाठी आपले मुल म्हणजे काळजाचा तुकडा. मनुष्य असो किंवा प्राणी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी झुरत असते. काही क्षणासाठी लेकरू डोळ्यासमोर नसेल तर, आई कावराबावरी होते. शिवाय मुलालाही आईशिवाय चैन पडत नाही. लहान मुल आपल्या आईसमोर बोलून वेदना व्यक्त करू शकतात. पण मुक्या प्राण्यांचे काय होत असेल? याची कल्पनाही करवत नाही.

सध्या अशाच एका आईविना हरवलेल्या हत्तीच्या पिल्लाची गोष्ट सोशल मिडियात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी सुप्रिया साहू (IAS Supriya Sahu) यांनी कळपापासून विभक्त झालेल्या हत्तीच्या पिल्लाचा शोधकार्याचा व्हिडिओ शेअर केला होता. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शॉर्ट फिल्म बनवण्याची मागणी केली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय आहे? हत्तीच्या पिल्लाची नेमकी आईसोबत भेट कशी घडली? पाहूयात(Pollachi Foresters Rescue Baby Elephant, Mother Raises Her Trunk To 'Thank' — Video Goes Viral).

ताटातूट झालेल्या पिल्लाची आईशी घडवून आणली भेट

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी काही दिवसांपूर्वी एक हृदयस्पर्शी व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'अनामलाई व्याघ्र प्रकल्पात एका हत्तीच्या पिल्लाची कळपापासून ताटातूट झाली.'

ड्रोनच्या मदतीने शोधले पिल्लाच्या आईला

अनमलाई टायगर रिझर्व हे तमिळनाडूच्या पोल्‍लाचीमध्ये स्थित आहे. जंगलात भरकटलेले एका हत्तीचे पिल्लू आपल्या आईला शोधत होते. याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळताच, त्यांनी इतर हत्तींच्या कळपाचा शोध सुरू केला. या शोधकार्यात त्यांनी ड्रोनची मदत घेतली. ड्रोनमध्ये हत्तींचा कळप दिसल्यानंतर त्यांनी त्या पिल्लाला घेऊन कळपाच्या दिशेने वाटचाल केली, आणि त्यांना पिल्लाची आई भेटली.

आलिया ते रकुल नवरीला हवी पेस्टल शेड! भडक रंग टाळून फिकट रंगाचा का आला ट्रेण्ड?

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करत शॉर्ट फिल्म बनवण्याची केली मागणी

एकटीने प्रवास करणाऱ्या तरुणीचे बळकावले सीट, ट्विट व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची मदत

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केलेला व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला आहे. टीमचे कौतुक करत त्यांनी लिहिले की, 'तुम्ही भावना आणि तंत्रज्ञानाचे एक महत्त्वाचे मिश्रण सादर केले आहे; त्यावर शॉर्ट फिल्म बनवा.' सध्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेण्टचा वर्षाव होत असून, अनेकांनी शोधकार्य टीमचे कौतुक केले आहे.

Web Title: Pollachi Foresters Rescue Baby Elephant, Mother Raises Her Trunk To 'Thank' — Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.