lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > आलिया ते रकुल नवरीला हवी पेस्टल शेड! भडक रंग टाळून फिकट रंगाचा का आला ट्रेण्ड?

आलिया ते रकुल नवरीला हवी पेस्टल शेड! भडक रंग टाळून फिकट रंगाचा का आला ट्रेण्ड?

why pastels lehengas are so popular among indian brides : आलियापासून ते किआरापर्यंत सारेच घालत्यात पेस्टल शेड्स लेहेंगा; याची नेमकी खासियत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 06:58 PM2024-02-23T18:58:20+5:302024-02-25T11:09:15+5:30

why pastels lehengas are so popular among indian brides : आलियापासून ते किआरापर्यंत सारेच घालत्यात पेस्टल शेड्स लेहेंगा; याची नेमकी खासियत काय?

why pastels lehengas are so popular among indian brides? | आलिया ते रकुल नवरीला हवी पेस्टल शेड! भडक रंग टाळून फिकट रंगाचा का आला ट्रेण्ड?

आलिया ते रकुल नवरीला हवी पेस्टल शेड! भडक रंग टाळून फिकट रंगाचा का आला ट्रेण्ड?

आता लवकरच वेडिंग सिझन सुरु होईल. 'तारे है बाराती, चांदनी है ये बारात' म्हणत बऱ्याच ठिकाणी सनई चौघडेचे सूर घुमू लागतील. लाल किंवा हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात वधू, तर वर शेरवानीमध्ये दिसेल. पण आता काळानुसार फॅशन बदलत चालली आहे. महिलांना आता पेस्टल शेड्सची भुरळ पडली असल्याचं दिसून येत आहे. आलियाने जेव्हा पेस्टल शेड्सच्या लेहेंग्यासोबत नो मेकअप लूक कॅरी केला, तेव्हा प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या (Trending Fashion). तेव्हापासून सामान्य ते सिलेब्रिटींपर्यंत सगळ्यांना पेस्टल शेड्सची भुरळ पडली.

आलियाच्या (Alia Bhatt) आधी अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) पेस्टल पेल ब्लश पिंक सिल्क लेहेंगा प्रचंड व्हायरल झाला होता (Pastels Shades Lehenga). पण महिलावर्ग लाल किंवा हिरव्या अशा भडक रंगांना मागे टाकत पेस्टल शेड्सची निवड का करत आहे? तरूणाईंमध्ये पेस्टल शेड्स इतका फेमस कसा झाला?(why pastels lehengas are so popular among indian brides?).

भारतीय नववधूंना पेस्टल लेहेंग्याची भुरळ

- पेस्टल रंगाचे लेहेंगे त्यांच्या मऊ फॅब्रिक आणि नाजूक नक्षीकामामुळे प्रसिद्ध आहे. ब्लश पिंक, मिंट ग्रीन, लिलाक आणि पावडर ब्लू यांसारखे पेस्टल शेड्स रोमँटिक आणि सिंपल-रॉयल लूक देतात.

एकटीने प्रवास करणाऱ्या तरुणीचे बळकावले सीट, ट्विट व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची मदत

- पेस्टल लेहेंगे इतके लोकप्रिय होण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे या शेड्सचे लेहेंगे आपण इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही ठिकाणी घालू शकता. हे लेहेंगे आपण राजवाड्यात यासह बीचवर फोटोशूटसाठी देखील परिधान करू शकता. हे लेहेंगे कुठेही घातल्यास आपल्याला एक रॉयल लूक नक्कीच मिळेल.

- थोडक्यात काय तर, पेस्टल लेहेंगा भारतीय नववधूंमध्ये त्यांच्या नाजूक, मोहक आणि आकर्षक रंगांमुळे प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे महिलावर्ग आता भडक रंग आणि हेवी वर्क लेहेंग्याला मागे टाकत, पेस्टल सिंपल शेड्सचे कपडे परिधान करण्यास प्राधान्य देत आहे.

पेस्टल रंगाच्या लेहेंग्यामध्ये आपण विविध लुक्स कॅरी करू शकता

पेस्टल रंगाचे लेहेंगे फक्त त्याच्या रंगासाठी नसून, त्यावर कॅरी करणाऱ्या लुक्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. आपण यावर कोणतेही प्रकारचे दागिने कॅरी करू शकता. उदाहरणार्थ, जर आपल्याला ग्लॅमर लूक हवा असेल तर, वधू आपल्या ॲक्सेसरीजमध्ये हेवी झुमके आणि भरगच्च नेकलेस घालू शकते.

‘देहाती मॅडम’ची इंग्रजी शिकवणी! डोक्यावर पदर घेऊन फाडफाड इंग्रजी शिकवणारी कोण ‘ती?’

सिंपल मेकअप दिसेल शोभून

बऱ्याच सेलिब्रिटी आपल्या लग्नात पेस्टल रंगाचे लेहेंगे कॅरी करताना दिसत आहेत. शिवाय त्यावर मिनिमल किंवा नो मेकअप लूक शोभून दिसतो. मुख्य म्हणजे यावर भडक मेकअप करण्याची काहीही आवश्यकता वाटत नाही. 

Web Title: why pastels lehengas are so popular among indian brides?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.