फ्री शिलाई मशीन (Free Sewing Machine Scheme) योजना ही पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या संकल्पनेतून देशातील गरीब, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटूंबातील महिलांना स्वंयरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे. या उद्देशानं सुरू करण्यात आली आहे. या योजनील पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते. (PM Free Sewing Machine Scheme)
या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत?
१) अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
२) महिलेचे वय साधारण २० ते ४० या वयोगटात असावे.
३) महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबातील असावी.
४) कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे दीड लाखांपेक्षा कमी असावे.
५) विधवा, दिव्यांग महिलांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाते.
६) काही योजनांमध्ये महिलेकडे शिलाई मशीनच्या कामाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
७) या योजनेत लाभार्थ्यांना पैसे भरावे लागत नाही. शासनाकडूनच शिलाई मशिनसाठी १५ हजारांची आर्थिक मदत मिळते.
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि नियम
योजनेनुसार अर्ज करण्याची पद्धत बदलू शकते. अनेकदा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशिनसाठी अर्ज स्वीकारले जातात. अर्ज करण्याची प्रक्रिया बहूतेकवेळा ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात असते. यासाठी केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट https://pmvishwakarma.gov.in/ तपासा. तुम्हाला फ्री शिलाई मशीन योजना किंवा पीएम विश्वकर्म योजना अंतर्गंत अर्ज करून नोंदणी करावी लागेल.
आवश्यक असलेली सर्व माहिती आणि कागदपत्र त्या सोबत जोडावे लागतील.ऑफलाईन पद्धतींसाठी अर्जाचा नमुना प्रिंट करून तो भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शासकिय कार्यालयात जमा करावा लागतो. महिला आणि बाल कल्याण विकास विभाग किंवा जिल्हा परीषद अंतर्गत तुम्ही या योजना पुन्हा तपासू शकता.
शासनाचे नियम
१) एका कुटूंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळतो.
२) योजनेच्या नियमांनुसार पात्रतेच्या अटी पूर्ण करणं बंधनकारक आहे.
महत्वाच्या कागदपत्रांची यादी
१) महिलेचे आधार कार्ड
२) कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
३) वयाचा पुरावा.
४) रहिवासी प्रमाणपत्र
५) पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
६) पासपोर्ट साईज फोटो, मोबाईन नंबर
७) आवश्यक असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, शिलाई कोर्स प्रमाणपत्र.
महाराष्ट्रातील महिला ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करू शकतात. सध्या अनेकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत साहाय्य केले जात आहे. ज्यात शिलाई मशीनसाठी १५००० रूपये दिले जात आहेत.
महत्वाचे
फेक कॉल्स किंवा फेक वेबसाईट्सपासून सावध राहा. अनेकदा फ्री शिलाई मशीनच्या नावाखाली बनावट वेबसाईट्स किंवा व्यक्ती अर्ज फी मागतात. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा साईटला पैसे देऊ नका.
