आजकाल लग्न करायचे म्हणजे खिशाला जबरदस्त कात्री लागते. जेवणाचे एक ताट शेकड्यात मोजायचे. अनेक खर्च असतात. सजावटीपासून हॉलच्या भाड्यापर्यंत लाखोत खर्च करावा लागतो. (Photographer gets angry at wedding, see what happens next)मात्र आजकाल हॉलपेक्षाही महाग पडते ते म्हणजे फोटोग्राफरचे भाडे. आता लग्नात विविध कार्यक्रम केले जातात. प्रत्येक कार्यक्रमाचे साग्रसंगीत शुटींग व्हायलाच हवे. त्याकडे कल जास्त असतो. मांडवात आरडाओरडा करणारे भटजी तर आजकाल इंस्टाग्रावर रोजच व्हायरल होत असतात. एकच विधी चांगला शुट व्हावा यासाठी नवरा नवरीला परत परत तोच विधी करायला लावतात. मग भटजींच्या रागाचा पारा चढतोच. (Photographer gets angry at wedding, see what happens next)असे किस्से लग्नांमध्ये आता अगदी कॉमन झाले आहेत.
फोटोग्राफर आणि लग्नात आलेल्या वर्हाडींचीही भांडणे होतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. मत्र इथे अगदी वेगळाच किस्सा घडला आहे. चांगले फोटो मिळवे म्हणून लोकांना शांत करणारे नवरा नवरीच फोटोग्रारविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवायला निघाले. भांडण झाले ते अगदी शुल्लक कारणवरुन मात्र त्याचा परिणाम नवरानवरीसाठी फार वाईट ठरला.
झाले असे की लग्नादरम्यान सगळ्या विधींचे अगदी सुंदर असे फोटो फोटोग्राफर काढत होता. सगळे त्याच्या कामावर खुषही होते. जेवणाची वेळ झाली मग फोटोग्राफरने त्याला भूक लागल्याचे नव्या जोडप्याला सांगितले. आता भारतात पाण्याला व अन्नाला कधीच नाही म्हणू नये असे मानले जाते. मात्र नवरानवरीला फोटो काढायचे असल्याने त्यांनी फोटोग्राफरला थोड्या वेळाने जेव असे सांगितले. फोटोग्राफरनेही त्यांचे ऐकले व काम चालू ठेवले. असं म्हणतात माणसाला भूक लागली की मग काहीच सुचत नाही. काम कितीही असो वेळेला जेवण हवेच. आधी पोटोबा मग विठोबा!!
सगळे काम संपल्यावर फोटोग्राफर जेवायला गेला. तेव्हा त्याला कळले की जेवण तर संपले आहे. भूक अनावर झालेल्या आणि दिवसभर काम केलेल्या त्या फोटोग्राफरला जेवण न मिळाल्याने तो अगदी वैतागला राग अगदी अनावर झाल्याने त्याने लग्नसमारंभाचे सगळे फोटो डिलिटच करुन टाकले. एकाही विधीचे फोटो ठेवले नाहीत. द टाईम्सच्या मजकुरात सांगितल्यानुसार, क्लायंटनी पोलिसात तक्रार नोंदवू असे सांगितले.
याप्रसंगाबद्दल लोकांची अनेक मते आहेत. काहींना फोटोग्राफरचे वागणे चुकीचे वाटत आहे तर काही जण त्याचे बरोबर असल्याचे सांगत आहेत. कोणत्याही क्षेत्रास काम कणाऱ्या माणसांना जेवणाची व्यवस्था मिळायलाच हवी असेही काही जणांनी म्हटले.