lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > 4 वर्षाचा चुणचुणीत मुलगा बनवतोय शेंगदाण्याची चटणी; त्याच्या आवाजावर नेटिझन्स फिदा, पाहा व्हिडीओ

4 वर्षाचा चुणचुणीत मुलगा बनवतोय शेंगदाण्याची चटणी; त्याच्या आवाजावर नेटिझन्स फिदा, पाहा व्हिडीओ

हल्ली तर शाळेतही पहिली दुसरीतल्या मुलांना स्वयंपाकात आई-बाबांना मदत करावी. भाजी कशी निवडावी हे शिकावं.. अशा सूचना दिल्या जातात. शाळेतून निरोप आले तरी आया सहजासहजी मुलांना स्वयंपाकघरात काही करु देत नाही. पण हैद्राबादमधील एक आई आणि तिचा 4 वर्षांचा मुलगा यांची गोष्टच वेगळी. सध्या या मुलाचं एका व्हिडीओवरुन खूप कौतुक होतंय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 04:25 PM2021-12-30T16:25:08+5:302021-12-31T13:38:54+5:30

हल्ली तर शाळेतही पहिली दुसरीतल्या मुलांना स्वयंपाकात आई-बाबांना मदत करावी. भाजी कशी निवडावी हे शिकावं.. अशा सूचना दिल्या जातात. शाळेतून निरोप आले तरी आया सहजासहजी मुलांना स्वयंपाकघरात काही करु देत नाही. पण हैद्राबादमधील एक आई आणि तिचा 4 वर्षांचा मुलगा यांची गोष्टच वेगळी. सध्या या मुलाचं एका व्हिडीओवरुन खूप कौतुक होतंय.

Peanut chutney made by a 4-year-old boy; Netizens fall love in his voice, watch the video | 4 वर्षाचा चुणचुणीत मुलगा बनवतोय शेंगदाण्याची चटणी; त्याच्या आवाजावर नेटिझन्स फिदा, पाहा व्हिडीओ

4 वर्षाचा चुणचुणीत मुलगा बनवतोय शेंगदाण्याची चटणी; त्याच्या आवाजावर नेटिझन्स फिदा, पाहा व्हिडीओ

Highlightsराहिल हा अवघा चार वर्षांचा पण चटणी शिकवताना एक स्टेपही चुकत नाही की मागेपुढे होत नाही.स्वत:ला आवडणारी चटणी स्वत: करुन पाहाण्याचा आनंद राहिलच्य आईनं त्याला मुक्तपणे घेऊ दिला.साधी रेसिपी पण ती वैशिष्टपूर्ण केली ती राहिलनं स्वत:च्या बनवून आणि इतरांना शिकवून. 

तुमचं स्वयंपाकघरात काय काम? असा  दरडावून विचारत आई, आजी लहान मुलं ओट्याच्या जवळ आली की त्यांना बाहेर पिटाळतात. मुलांनी स्वयंपाक करताना मधेमधे करु नये असं मुलांना कळकळीनं सांगणाऱ्या आया हीच मुलं मोठी झाली की साधा चहा स्वत:ला करुन पिता येत नाही म्हणत त्यांना ओरडतात. हे चित्रं जवळजवळ प्रत्येक घरातच दिसतं. मुलांचं स्वयंपाकघरात असणं म्हणजे काहीतरी सांडलवड, नुकसान किंवा त्यांना काहीतरी इजा अशी भिती डोक्यात असते. मुलं लहान असली म्हणून काय झालं पण त्यांनाही आई स्वयंपाक कशी करते, आपला आवडीचा खाऊ कसा तयार करते, हे जवळून पाहायचं असतं.  हल्ली तर शाळेतही पहिली दुसरीतल्या मुलांना स्वयंपाकात आई-बाबांना मदत करावी. भाजी कशी निवडावी हे शिकावं.. अशा सूचना दिल्या जातात. शाळेतून निरोप आले तरी आया सहजासहजी मुलांना स्वयंपाकघरात काही करु देत नाही. पण हैद्राबादमधील एक आई आणि तिचा 4 वर्षांचा मुलगा यांची गोष्टच वेगळी. सध्या या मुलाचं एका व्हिडीओवरुन खूप कौतुक होतंय.

Image: Google
 मोनिका सहा या हैद्राबादमधे राहातात. त्यांना 4 वर्षांचा राहील नावाचा मुलगा आहे. मोनिका सहा या ॲट मोनिकाब्लेण्डस नावाने  पाककृतीविषयीचा ब्लाॅग चालवतात. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउण्टवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत राहिल त्याच्या आईसोबत स्वयंपाकघरात आहे. तो काही आईच्या कामात लूडबूड करत नाहीये. उलट सर्व सूत्रं राहिलनं आपल्या हातात घेतली आहेत. राहिल या व्हिडीओत शेंगदाण्याची त्याला आवडते तशी चटणी करायला शिकवतो आहे. राहिलच्या पध्दतीची चटणी चविष्ट तर असेलच यात शंका नाही. पण राहिल शिकवत असलेल्या चटणीचा व्हिडीओ मात्र फारच भारी आहेत. गोड आवाजात राहिल व्हिडीओतून थेट चटणी करायलाच शिकवतो. या व्हिडीओतील त्याच्या हालचाली, त्याच्या शब्दातील गोडवा पाहाणाऱ्याचं लक्ष वेधतात, व्हिडीओ संपेपर्यंत राहिल आणि त्याच्या हालचालींवरुन नजर हटत नाही. शेंगदाणे सांडवू नकोस असं जवळ उभी असलेली आई त्याला सांगते, तर राहिलही कृती सांगतांना पिनटस गिराने के नहीं असं सांगतो तेव्हा त्यांच्या निरागसतेचं कौतुक वाटतं.

Image: Google

या व्हिडीओतून राहिल आधी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावेत. ते किती खरपूस ते तो एखाद्या मोठ्या माणसासारखा भाजलेला शेंगदाणा बोटात चोळून  सालं काढून दाखवतो.  मग  शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालावेत. त्यात आलं-लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं  घालावीत असं सांगतो. थोडासा योगर्ट ( दही) म्हणत तो वाटीभर दही घालतो, थोडं मीठ घालण्यास सांगतो. मग हे थोडं वाटून् घ्यावं असं म्हणतो. मग त्याची आई म्हणते थोडं नाही चांगलं वाटून् घ्यावं. पण आपण बोलताना चुकलो हे कळूही न देता तो पुढच्याच वाक्याला चटणी चांगली वाटून घ्यावी म्हणतो.  चटणीवर तेल तापवून त्यात मोहरी घालून तडका द्यायला सांगण्यास तो विसरत नाही. 

Image: Google

अतिशय गोड पध्दतीने वर्णन करुन सांगितलेली ही चटणी एका वाटीमधे काढून तो चमच्यानं खाऊन चांगली झाल्याची पावतीही देतो.  चटणी करताना आणि शकवताना राहिल एक स्टेपही चुकत नाही, विसरत नाही की मागेपुढे करत नाही. 

राहिलच्या आईनं हा पोस्ट केलेल्या त्याच्या व्हिडीओचं सर्वत्र कौतुक होतं आहे. किती गोडं आवाज.. किती साधी पाककृती पण राहिलच्या आवाजानं किती वैशिष्ट्यपूर्ण झाली , अशी कौतुकाची पावती लोकांनी सोशल मीडियावरुन राहिला दिली. आपल्या मुलाला स्वयंपाकघरात इतक्या  मोकळेपणानं वागू देणाऱ्या त्याच्या आईचंही कौतुक होत आहे. राहिलच्या पध्दतीची दाण्याची ओली चटणी करुन पाहायची असल्यास   त्याच्या गोड आवाजात रेकाॅर्ड केलेला व्हिडीओ पाहायलाच हवा!

Web Title: Peanut chutney made by a 4-year-old boy; Netizens fall love in his voice, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.