Join us

Pastry ka pakoda : अरेरे! पेस्ट्री बेसन पिठात घोळवून भजीसारखी तळली; अन् तोंडात टाकताच कशी रिॲक्शन दिली पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:10 IST

Pastry ka pakoda : पेस्ट्री पकोडाचा हा प्रयोग नेटिझन्सना फारसा आवडलेला दिसत नाहीये.

आजपर्यंत तुम्ही, भजी, पापड, बटाटावडा, समोसा तळतानाचे व्हिडीओ पाहिले असतील पण कधी केकचा तुकडा तळताना पाहिलाय का? आजकाल लोक काहीही करताना दिसत आहेत. पेस्ट्रीसोबतही कोणी असं करू शकतं असं वाटलं नव्हतं. विचित्र फूड कॉम्बिनेशनमुळे लोकांनी काय खाल्ले असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.  (Weird food experiment somebody fried pastry ka pakoda people are getting angry)

बेसन पीठात बुडवली पेस्ट्री

या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, याच कारणामुळे कोविड पूर्णपणे जात नाहीये. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की पेस्ट्रीच्या तुकड्याला बेसन पिठात घोळवताना एक व्यक्ती दिसते. एखाद्या भजीप्रमाणे पेस्ट्री तळली जाते. नंतर ती व्यक्ती ही पेस्ट्री खाण्याचा प्रयत्न करते. 

पेस्ट्री पकोडाचा हा प्रयोग नेटिझन्सना फारसा आवडलेला दिसत नाहीये. ही पेस्ट्री खाऊन पाहिल्यानंतर त्या तरूणानं नकारात्मक रिएक्शन दिलेली पाहू शकता. 

टॅग्स :अन्नसोशल व्हायरलसोशल मीडिया