Join us  

वॉव, हे काय गजब! हाय हिल्स आणि स्कर्ट घालून 'ती'चं जबरदस्त कार्टव्हील.. बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 5:02 PM

Social Viral : इथं हाय हिल्स घातल्यावर अनेक जणींना चालणं अवघड होऊन बसतं... तिथं या बयेनं (Parul Arora) चक्क हाय हिल्स आणि स्कर्ट घालून कार्टव्हील केलंय...

ठळक मुद्देअवघ्या दोन- तीन दिवसांत या व्हिडियोला अडीच लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

लोक काय काय अजब- गजब प्रकार करतील, काही सांगता येत नाही... सोशल मिडियामुळे तर जगभरातल्या लोकांचं काय  सुरू आहे, हे सगळं पहायला मिळतं आणि त्यामुळेच तर सगळेच भन्नाट प्रकार जबरदस्त व्हायरल  होऊन जातात. आता हेच बघा ना पारूल अरोरा (Parul Arora) या तरूणीचा एक व्हिडियो (video)तुफान व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडियो पाहताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत  जाते. कारण चक्क स्कर्ट घालून कार्टव्हील (cartwheel)करण्याची हिंमत तिने दाखवली आहे.

 

कार्टव्हील हा प्रकार सध्या बराच लोकप्रिय होत आहे. हा व्यायामाचाच एक प्रकार आहे. यामध्ये सुरूवातीला सरळ ताठ उभं रहायचं. यानंतर दोन्ही हात वर करायचे. हात खाली आणि पाय वर... अशा अवस्थेतून हळूहळू दोन्ही हातांवर पुर्णपणे शरीराचा तोल पेलायचा. दोन्ही हात खाली आणि दोन्ही पाय वर म्हणजेच बोली भाषेत सांगायचं झाल्यास खाली डोकं वर पाय.. अशी सगळ्या शरीराची अवस्था होऊन जाते. यानंतर पुन्हा दोन्ही पाय खाली आणि हात वर या अवस्थेत शरीर येतं. कोणी कोणी एक सलग असे ४ ते ५ कार्टव्हील करतात. 

 

असंच कार्टव्हील पारूल अरोरा या तरूणीनं केलं आहे. आता खाली डोकं- वर पाय अशी कार्टव्हील करताना शरीराची अवस्था होते. अशा प्रकारचं हे कार्टव्हील करताना पारूलने चक्क स्कर्ट आणि हायहिल्स घातला आहे. पाय वर असतानाही तिने ज्या पद्धतीने तिचा स्कर्ट सांभाळला आहे, आणि ज्याप्रकारे हाय हिल्स असतानाही स्वत:चा तोल सावरला आहे, ते बघणं खरोखरंच अफलातून ठरतं.. त्यामुळेच तर तिच्या या व्हिडियोने नेटिझन्सचं जबरदस्त ॲट्रॅक्शन ओढवून घेतलं आहे.

 

पारूल ही एक फिटनेस मॉडेल (fitness model)असून नॅशनल जिमनॅस्ट (national gymnast)आहे. इन्स्टाग्रामवर (instagram)तिचे तब्बल २ लाख फॉलोअर्स असून फिटनेसचे तिचे अनेक व्हिडियो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत असतात. तिचा हा कार्टव्हीलचा व्हिडियोही तिने नुकताच  इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अवघ्या दोन- तीन दिवसांत या व्हिडियोला अडीच लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडियोमध्ये पारूलने पेन्सिल हिल प्रकारात मोडणाऱ्या हाय हिल्स घातल्या असून गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि निळ्या रंगाचे टॉप घातले आहे. तिच्या या जबरदस्त फिटनेस स्टंटवर नेटकरी जाम खूश झाले आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामफिटनेस टिप्स