Lokmat Sakhi >Social Viral > लोक दिसण्यावरुन नावं ठेवत, टोमणे मारत! परिणीती चोप्रा सांगते, पैसेच नव्हते तर...

लोक दिसण्यावरुन नावं ठेवत, टोमणे मारत! परिणीती चोप्रा सांगते, पैसेच नव्हते तर...

Parineeti Chopra About her struggling period: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने नुकतेच तिच्या सुरुवातीच्या स्ट्रगलिंग काळाविषयी सांगितले आहे. बघा ती नेमकं काय सांगते... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2024 03:35 PM2024-05-01T15:35:06+5:302024-05-02T15:12:18+5:30

Parineeti Chopra About her struggling period: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने नुकतेच तिच्या सुरुवातीच्या स्ट्रगलिंग काळाविषयी सांगितले आहे. बघा ती नेमकं काय सांगते... 

Parineeti chopra explains about her struggling period that she dont have money to hire fitness trainer and dietician | लोक दिसण्यावरुन नावं ठेवत, टोमणे मारत! परिणीती चोप्रा सांगते, पैसेच नव्हते तर...

लोक दिसण्यावरुन नावं ठेवत, टोमणे मारत! परिणीती चोप्रा सांगते, पैसेच नव्हते तर...

Highlightsतिचा पहिला चित्रपट जेव्हा साईन केला तेव्हाचा तिचा काळ कसा होता आणि ती किती सामान्य परिस्थितीतून वर आलेली आहे, हे तिने विशेषत: त्या मुलाखतीत सांगितले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या 'अमरसिंग चमकीला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातल्या तिच्या भुमिकेबद्दल आणि तिच्या गायनाबद्दल सध्या तिचे खूप कौतूक होत आहे. चित्रपटाच्या निमित्तानेच तिची एका वाहिनीने एक मुलाखत घेतली असून सध्या ती मुलाखत खूपच व्हायरल होते आहे. यामध्ये परिणीतीने तिच्या स्ट्रगलिंग काळाविषयी सांगितले आहे. अभिनेत्री म्हणून तिने बॉलीवूडमध्ये तिचा पहिला चित्रपट जेव्हा साईन केला तेव्हाचा तिचा काळ कसा होता आणि ती किती सामान्य परिस्थितीतून वर आलेली आहे, हे तिने विशेषत: त्या मुलाखतीत सांगितले आहे.

 

त्या मुलाखतीत परिणीती म्हणते की मी काही मुळची श्रीमंत नाही. अगदी सर्वसामान्य कुटूंबातून मी आलेली आहे. त्यामुळेच तर तिने सुरुवातीच्या काळात यशराज फिल्म्स येथे नोकरीही केली. त्यानंतर खुद्द आदित्य चोप्रा यांनी तिला फोनकरून ऑडिशनला बोलावले आणि नंतर तिचे करिअर एका वेगळ्या मार्गाने गेले, तो भाग वेगळा.

महाराष्ट्र दिन विशेष: 'या' मराठमोळ्या पदार्थांची सगळ्या जगाला पडली भुरळ, सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

सुरुवातीचे दोन चित्रपट केल्यानंतर तिच्या तिसऱ्या चित्रपटासाठी तिला वेटलॉस करण्याची गरज होती. यासाठी तिला पर्सनल फिटनेस ट्रेनर आणि डाएटिशियन घेण्याविषयी सुचविण्यात आले. त्या दोघांचा महिन्याचा खर्च अंदाजे ४ लाख रुपये होता. हा खर्च तिला अजिबातच परवडणारा नव्हता. कारण पहिल्या चित्रपटासाठी तिला जे मानधन मिळाले होते तेच केवळ ५ लाख रुपये होते.

 

ती म्हणते की हा खर्च परवडण्यासारखा नाही, हे तिने संबंधितांना स्पष्टच सांगितले. त्यावेळी अनेकांच्या तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लगेच बदलून गेला होता. चित्रपटातला माझा जो सहकलाकार होता, त्यानेही मला ट्रेनर, मेकअप आर्टिस्ट, डाएटिशियन हे सगळे लोक अपॉईंट करायला सांगितले.

फक्त पैठणीच नाही तर 'या' हॅण्डलूम साड्याही महाराष्ट्रात तयार होतात, तुमच्या कलेक्शनमध्ये त्या आहेत?

पण त्याला काहीही कल्पना नव्हती की माझ्यासारख्या सामान्य कुटूंबातून आलेल्या मुलीला या लोकांवर एवढा खर्च करणं मुळीच परवडणारं नव्हतं. आज परिणीती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटाशी संबंधित कोणतंही बॅकग्राउंड नसताना तिने स्वत:चं जे स्थान निर्माण केलं आहे, ते खरोखरच कौतूकास्पद आहे. 

 

Web Title: Parineeti chopra explains about her struggling period that she dont have money to hire fitness trainer and dietician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.