Lokmat Sakhi >Social Viral > ३ महिन्याच्या बाळाचे आईबाबा म्हणतात, ऑफिसात काम फार आमचं मूल दत्तक घ्या..

३ महिन्याच्या बाळाचे आईबाबा म्हणतात, ऑफिसात काम फार आमचं मूल दत्तक घ्या..

आम्ही खूप जास्त वर्कोहोलिक आहोत, त्यामुळे आम्हाला आमची मुलगी सांभाळणं होत नाहीये.. असं म्हणत वडिलांनी लिहिलेल्या पोस्टची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2024 07:15 PM2024-04-02T19:15:53+5:302024-04-02T19:16:41+5:30

आम्ही खूप जास्त वर्कोहोलिक आहोत, त्यामुळे आम्हाला आमची मुलगी सांभाळणं होत नाहीये.. असं म्हणत वडिलांनी लिहिलेल्या पोस्टची चर्चा

Parents of 3 month old baby say, office work is too much, adopt our child.. | ३ महिन्याच्या बाळाचे आईबाबा म्हणतात, ऑफिसात काम फार आमचं मूल दत्तक घ्या..

३ महिन्याच्या बाळाचे आईबाबा म्हणतात, ऑफिसात काम फार आमचं मूल दत्तक घ्या..

Highlightsही गोष्ट आहे आई- वडील दोघेही नोकरदार असणाऱ्या एका चिमुकलीची.मुलीचा जन्म होऊन अवघे ३ महिने झाले. पण तिच्या आई- वडिलांनी तिला दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्हाला मुलीला सांभाळणं शक्य नाही आमची मुलगी कुणीतरी दत्तक घ्या असं म्हणणाऱ्या पालकांची एक पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत  आहे. वाचून धक्काच बसेल, ही गोष्टच विचित्र असून त्या पालकांनी बाळासाठी घेतलेली भूमिका सर्वसामान्यांना न समजणारी आहे.

 

ही गोष्ट आहे आई- वडील दोघेही नोकरदार असणाऱ्या एका चिमुकलीची. न्यूज एटीन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार एलिझाबेथ नावाच्या या मुलीचा जन्म होऊन अवघे ३ महिने झाले. पण तिच्या आई- वडिलांनी तिला दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. आई- वडील दोघेही खूप जास्त वर्कोहोलिक आहेत. त्यामुळे त्यांना बाळ सांभाळणं, बाळाकडे लक्ष देणं होत नाहीये. बाळाच्या आईने बाळंतपणानंतर अवघ्या २ आठवड्यातच ऑफिसला जाणे सुरू केले. वडिलांनाही कामातून बाळ सांभाळायला वेळ नाही. याविषयी बाळाच्या वडिलांनी स्वत:च रीडइट वर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. 

 

पोस्ट शेअर करताना ते म्हणतात की बाळ होण्याच्या आधी मला वाटलं होतं की माझी पत्नी बदलेल. ती बाळाची काळजी घेईल. पण असं काहीच घडलं नाही. ती बाळाला ब्रेस्टफिडिंगही करत नाही. तसेच बाळाशी संवाद साधणं किंवा बाळासाठी काही गोष्टी करणंही तिला जमत नाहीये.

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

कारण आमचं दोघांचं एक रुटीन ठरलेलं असून आम्हाला त्या पलिकडे जाऊन बाळ सांभाळणं होत नाही. त्यामुळे आम्ही बाळ दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. बाळाची आजी किंवा मावशी त्यांची इच्छा झाली तर बाळाला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करू शकतात. बालकांच्या काही सेवाभावी संस्थांशीही या पालकांनी संपर्क साधला आहे.

माठ विकत आणताना तपासून घ्या ३ गोष्टी, पाणी होईल फ्रिजसारखं गारेगार- करा पैसावसूल खरेदी

त्यांच्या या पोस्टवर अनेक उलटसुलट कमेंट येत आहे. एवढा कसला कामाचा अट्टाहास, ही माणसं आहेत की भावना नसलेली रोबोट, बाळाला जन्म देण्याच्या आधी याचा विचार का नाही केला, अशा आशयाचे अनेक प्रश्न त्यांना विचारले जात आहेत. अनेकजण आईला दोष देत आहेत तर काहींना वाटते वडिलांनीही जबाबदारी घ्यायला हवी.

 

Web Title: Parents of 3 month old baby say, office work is too much, adopt our child..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.