lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अरे.. हा तर म्हाताऱ्यांचा इम्रान हाश्मी! आजोबांचे भलते रोमँटिक स्टंट.. व्हिडिओ व्हायरल

अरे.. हा तर म्हाताऱ्यांचा इम्रान हाश्मी! आजोबांचे भलते रोमँटिक स्टंट.. व्हिडिओ व्हायरल

Video Viral सोशल मिडीयावर हटके व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 02:17 PM2022-11-30T14:17:17+5:302022-11-30T14:56:42+5:30

Video Viral सोशल मिडीयावर हटके व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Oh!! This is the Imran Hashmi of old people! Grandpa's Romantic Stunt.. Video Viral | अरे.. हा तर म्हाताऱ्यांचा इम्रान हाश्मी! आजोबांचे भलते रोमँटिक स्टंट.. व्हिडिओ व्हायरल

अरे.. हा तर म्हाताऱ्यांचा इम्रान हाश्मी! आजोबांचे भलते रोमँटिक स्टंट.. व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मिडीयावर व्हायरल व्हिडिओंचा बोलबाला आहे. काही हटके कंटेंट मिळाला की व्हिडिओ व्हायरल झालाच म्हणून समजा. चिमुकल्यांपासून ते वयस्कर व्यक्तींचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे ठरतात, तर काही व्हिडिओला पाहून हसू आवरत नाही. काही लोकं बाईकवर स्टंट करतानाचे व्हिडिओ शेअर करतात. ज्यामुळे ते अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात एक वयस्कर व्यक्ती हेवी बाईक रायडींग करत आहे. बाईक रायडरच्या मागच्या सीटवर एक महिला लहान लेकराला घेऊन बसली आहे. ती महिला तरुण आणि बाईक रायडर वयस्कर दिसत आहे. मात्र, बाईकवर स्टंट करत असताना त्याने महिलेसह असे काही कृत्य केले, की ...

तर झालं असं, या व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती दुचाकी चालवत आहे. त्या बाईकस्वाराच्या मागे एक महिला देखील बसली आहे. ती महिला तरुण दिसत असून, तिच्या मांडीवर एक लहान बाळ आहे. रस्त्यावरून जात असताना तो वयस्कर व्यक्ती हेवी ड्रायविंग करताना दिसून येत आहे. ड्रायविंग करत असताना मागे बसलेल्या महिलेने त्या वयस्कर व्यक्तीचे चुंबन घेतले. त्याने देखील मागे वळून त्या तरुण महिलेचे चुंबन घेतले. रस्त्यावरून जात असेलेल्या मुलांनी व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. ती मुलं व्हिडिओ करत असल्याचे पाहून त्या वयस्कर व्यक्तीने नको नको ते चाळे केले आहेत.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ "जिदंगी गुलजार है" या  इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ''बुजुर्गों का इमरान हाश्मी'' असं देखील एकाने कमेंट केली आहे. तर लहान मुलगा गाडीवर असताना असा स्टंट करणं चुकीचं असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं आहे.

Web Title: Oh!! This is the Imran Hashmi of old people! Grandpa's Romantic Stunt.. Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.