Lokmat Sakhi >Social Viral > आजी घरी करायची तसं बदामाचं काजळ आता करा सहज,डोळे दिसतील सुंदर आणि टप्पोरे

आजी घरी करायची तसं बदामाचं काजळ आता करा सहज,डोळे दिसतील सुंदर आणि टप्पोरे

Now make almond mascara just like grandma used to make at home : डोळ्यांसाठी छान गडद काळे काजळ घरीच तयार करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 13:33 IST2025-04-22T13:32:38+5:302025-04-22T13:33:26+5:30

Now make almond mascara just like grandma used to make at home : डोळ्यांसाठी छान गडद काळे काजळ घरीच तयार करा.

Now make almond mascara just like grandma used to make at home | आजी घरी करायची तसं बदामाचं काजळ आता करा सहज,डोळे दिसतील सुंदर आणि टप्पोरे

आजी घरी करायची तसं बदामाचं काजळ आता करा सहज,डोळे दिसतील सुंदर आणि टप्पोरे

महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारचा साज करतात. गळ्यामध्ये हार घालतात. कानामध्ये कानातले तसेच हातामध्ये बांगड्या मात्र काही शृंगाराचे प्रकार असे आहेत जे अवयवांची सुंदरता वाढवतात. (Now make almond mascara just like grandma used to make at home)जसे की गजरा. केसात गजरा माळल्यावर केस खुपच जास्त सुंदर दिसतात. आजकाल मेकअपसाठी अनेकविध प्रॉडक्ट्स बाजारात मिळतात. लिपस्टीक, पावडर, ब्लश आदी अनेक प्रकार असतात. डोळ्यांसाठी आयलायनर तसेच आयकलर वगैरे अनेक जणी वापरतात.(Now make almond mascara just like grandma used to make at home) मात्र डोळ्यांची खरी सुंदरता वाढवणारी गोष्ट म्हणजे काजळ. डोळ्यातून काजळाचे बोट फिरवल्यावर डोळ्याच्या कडा अगदीच सुंदर गडद दिसतात. अनेक प्रकारचे काजळ आता बाजारात मिळते. अनेक रंगाचेही मिळतात. मात्र वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या काळ्या काजळाला काही तोड नाही. 

काजळ घरी तयार करता येते. अगदी सोपे आहे. फार काही सामग्री लागत नाही घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करुन काजळ तयार करता येते. बदामाचा वापर करुन केलेले हे काजळ डोळ्यांसाठी अजिबात अपायकारक ठरणार नाही. घरी केलेल्या काजळात हानिकारक असे कोणतेही घटक वापरायचे नाहीत. फक्त नैसर्गिक काळी पूड तयार करुन वापरायची.

कृती
१. एक पणती घ्या. जरा आकाराला मोठी असलेली पणती वापरा. अगदी लहानशी पणती वापरु नका. पणतीमध्ये चमचाभर तूप घाला. गायीचे तूप वापरले तरी चालेल. गायीचे तूप डोळ्यांसाठी फार फायद्याचे असते. 

२.कापसाची वात तयार करुन घ्या. कापूस जरा बोटांनी पसरवा. मोकळा करा. मग त्यामध्ये ओवा भरा. ओवा भरुन झाल्यावर त्याची वात करुन घ्या. हाताच्या तळव्यांमध्ये गोलगोल फिरवून वात वळा. 

३. पणतीमध्ये दोन बदाम घाला. बदामामुळे मस्त गडद रंगाचे काजळ मिळते. तयार केलेल्या वातींना थोडे तूप लावा. मग त्या वाती पणतीमध्ये ठेवा. दोन किंवा चार वाती वापरा एकच वापरली तर काजळ जास्त तयार होत नाही.

४. पणतीच्या आजूबाजूला वीतभर आकाराच्या बरण्या किंवा काहीही ठेवा ज्यावर उलटी ताटली आरामात राहील. मोठ्या कडा असलेली एक ताटली पणतीवर उलटी ठेवा. 

५. पणती विझली की ताटलीवर काळी पूड जमा धालेली दिसले. ती काढून घ्या. त्यामध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल घाला. अगदी काही थेंबच तेल वापरा. एका डबीमध्ये साठवून ठेवा.  

Web Title: Now make almond mascara just like grandma used to make at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.