बऱ्याच मुलींचं स्वप्न असतं की त्यांना नुसतं बारीक नाही व्हायचं, तर त्यांना झीरो फिगर हवी आहे. अनेक जणी शरीर किती सुदृढ आहे याला महत्त्व कमी देतात. शरीर किती बारीक आहे याला जास्त महत्त्व देतात. आवडीचे कपडे घालण्यासाठी म्हणून खास काही जणी झीरो फिगर मध्ये राहण्याचा प्रयत्न करतात.(Not Just Thin, She's 'Ultra Thin', See Viral Photo Of Russian Model) आजकाल महिला स्वास्थ्यापेक्षा सुंदर दिसण्याला जास्त महत्त्व द्यायला लागल्या आहेत. ही अशी फिगर सांभाळण्यासाठी किंवा बनवण्यासाठी या मुली फार कष्ट घेतात. खाण्याच्या सवयी बदलतात. नियमित अति व्यायाम करतात. एवढंच नाही तर सर्जरीसुद्धा करून घेतात. विविध औषधे घेतात. एंग्जेक्शन घेतात. बरंच काही करतात.(Not Just Thin, She's 'Ultra Thin', See Viral Photo Of Russian Model)
आपण अशा बारीक मुलींना तर सतत बघतोच. मॉडल असोत वा अभिनेत्री आपल्याला झीरो फिगरमध्ये दिसतात. पण तुम्ही'क्सेनिया कारपोवा' सारखी फिगर कधीच बघितली नसेल. क्सेनिया ही एक मॉस्को मध्ये राहणारी मॉडल आहे. ती सोशल मिडिया इनफ्यूएन्सर आहे. ती तिचा दिनक्रम तिच्या पेजवर पोस्ट करत असते. तिने ती दिवसभरात काय खातो, असा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केल्यावर लोकांनी ती खोटं बोलते असा दावा केला. ती म्हणते तिचे वजन ५० किलो आहे. यावरही तिच्या फॉलोवर्सना विश्वास बसत नाही. (Not Just Thin, She's 'Ultra Thin', See Viral Photo Of Russian Model)
क्सेनिया २१ वर्षाची आहे. इंस्टाग्रामवर तिचे २९०,००० फॉलोवर्स आहेत. तिने तिची सांगितलेली दिनचर्या लोकांना खोटी वाटते. आणि ती खरच जेवते का असा प्रश्न तिला सगळे विचारत आहेत. ती रोज २५००० पावले चालते असेही तिने सांगितले. तीच्याकडे बघून काही जण तिला फॉलो करतात. तर काही ट्रोल करतात. आता तिच्या शरीराची ठेवण खरच तशी आहे का तिला काही त्रास आहे हे कोणाला माहिती नाही. एवढं बारीक असणं खरच चांगलं आहे का असा प्रश्न तिला पाहून लोकांना पडला आहे.