Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > गरोदर न राहता मूल पदरात, भलताच नवा व्यापार! गुप्त गरोदरपणाचा नवा ट्रॅप

गरोदर न राहता मूल पदरात, भलताच नवा व्यापार! गुप्त गरोदरपणाचा नवा ट्रॅप

मूल हवं असलेल्या बायकांची १५ महिन्यांच्या गुप्त गरोदरपणातून फसवणूक होते तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 18:29 IST2024-12-19T18:27:56+5:302024-12-19T18:29:37+5:30

मूल हवं असलेल्या बायकांची १५ महिन्यांच्या गुप्त गरोदरपणातून फसवणूक होते तेव्हा..

Nigerian women cryptic pregnancy, pregnant for 15 months | गरोदर न राहता मूल पदरात, भलताच नवा व्यापार! गुप्त गरोदरपणाचा नवा ट्रॅप

गरोदर न राहता मूल पदरात, भलताच नवा व्यापार! गुप्त गरोदरपणाचा नवा ट्रॅप

Highlightsया औषधांचा परिणाम म्हणजे बायकांच्या पोटावर सूज येते. या सुजेलाच बायका आपण गरोदर असल्याचं मानतात.

माधुरी पेठकर

आपल्याला मूल झालं नाही तर काय या विचाराने नायजेरियन बायकांचा जीव घाबरतो. नायजेरियात बायकांवर सामाजिक दडपण असतं. मूल नसलेल्या महिलांचा घरात, समाजात अपमान आणि छळ होतो. हे सारं आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून मूल होण्यात अडचणी येणाऱ्या बायकांनी 'गुप्त गरोदरपणा'चा म्हणजेच 'क्रिप्टिक प्रेग्नन्सी'चा मार्ग अवलंबला आहे. मात्र मूल होण्यासाठी अधीर झालेल्या बायकांच्या या गरजेचाच फायदा घेऊन त्यांना क्रिप्टिक प्रेग्नंसीद्वारे फसवलं जात आहे. बनावट डाॅक्टर आणि नर्सेस बायकांना १५ महिन्यांच्या गरोदरपणानंतर तुमच्या हातात तुमचं स्वत:चं बाळ असेल असं प्रलोभन दाखवतात. बायकाही त्यावर विश्वास ठेवतात. मग त्यांच्यावर उपचार सुरू होतात.
दोन टप्प्यातला उपचारांसाठी बराच खर्च होईल याचा अंदाज बायकांना दिला जातो. पहिल्या टप्प्यातल्या उपचारासाठी हे डाॅक्टर्स शेकडो डाॅलर्स बायकांकडून वसूल करतात. यात बायकांना इंजेक्शन दिलं जातं, पिण्यासाठी एक औषध दिलं जातं आणि योनी मार्गात ठेवण्यासाठी पावडर दिली जाते. या औषधांचा परिणाम म्हणजे बायकांच्या पोटावर सूज येते. या सुजेलाच बायका आपण गरोदर असल्याचं मानतात. नेहमीच्या दवाखान्यात जाऊन तपासणी केल्यास रिपोर्ट सांगतात की, तुम्ही गरोदर नाही. त्यामुळे उपचार करणारे डाॅक्टर, नर्सेस बायकांना नेहमीच्या दवाखान्यात जाऊच देत नाहीत.

प्रत्यक्ष प्रसूतीसाठी बायका जेव्हा येतात तेव्हा देखील त्यांची फसवणूक होते. या टप्प्यावर बायकांना कंबरेत महागडं इंजेक्शन दिलं जातं. यामुळे त्यांना गुंगी येते. त्यांना जेव्हा जाग येते तेव्हा पोटावर शस्त्रक्रिया केल्याची चीर असते. त्यांच्याजवळ बाळ असतं. प्रत्यक्षात ते त्यांचं नसतंच. प्रत्यक्ष गरोदर बायकांना फसवून त्यांच्याकडून मिळवलेली बाळं अशी 'क्रिप्टिक प्रेग्नंसी' असलेल्या बायकांना दिली जातात. अनेक नायजेरियन बायकांना आपली अशाप्रकारे फसवणूक होतेय याची कल्पनाही नसते. नायजेरियात शोधपत्रकारिता करणाऱ्यांनी पहिल्यांदा या विषयाला वाचा फोडली आणि नायजेरियातल्या गुप्त गरोदरपणाचं रहस्य जगाला समजलं.

Web Title: Nigerian women cryptic pregnancy, pregnant for 15 months