Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:28 IST

सध्या सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती हातात गिटार घेऊन एक रोमँटिक गाणं गाताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती हातात गिटार घेऊन एक रोमँटिक गाणं गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तान्या नावाची वधू फिल्मी अंदाजात गाताना दिसत आहे. "मैंने कभी सोचा ना था एक दिन तुम मुझे मिल जाओगे" हे गाणं गायलं. सर्वत्र आता तिचं भरभरून कौतुक होत आहे.

रिपोर्टनुसार, गाझियाबादमधील मोहम्मद कदीम गावातील रहिवासी आदित्य गौतम सध्या सहारनपूरमध्ये एसडीओ म्हणून तैनात आहे. आदित्यने २८ नोव्हेंबर रोजी केदारनाथ धाम येथील एका मंदिरात अलीगढ येथील रहिवासी तान्याशी लग्न केलं. लग्नानंतर या कपलने १ डिसेंबर रोजी मेरठमधील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन केलं होतं. तान्या सहारनपूरमधील एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे.

या व्हिडिओमागील गोष्ट देखील खूपच रंजक आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, ३० नोव्हेंबर रोजी, तिच्या सासरच्या घरी संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, तान्याने गिटार वाजवत एक रोमँटिक गाणं गायलं. कुटुंबातील सदस्यांनी तान्याच्या परफॉर्मन्सचं खूप कौतुक केलं. आदित्य गौतमची मावशी मीना कुमारी यांनी हा संपूर्ण क्षण त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केला.

मुलांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नंतर हा व्हिडीओ त्यांच्या अपलोड करण्यात आला. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ येताच ती जोरदार लोकप्रिय झाली. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी तान्याचा आवाज, आत्मविश्वास आणि गिटार वाजवण्याच्या कौशल्याचं कौतुक केलं. अनेकांनी याला लग्नातील सर्वात सुंदर आणि अनोखा क्षण म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Viral bride: Guitar in hand, romantic song steals hearts.

Web Summary : Tanya, a professor, became an internet sensation after a video of her singing and playing guitar at her wedding reception went viral. Her performance of 'Maine Kabhi Socha Na Tha' has garnered widespread praise.
टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल