Join us

New Brides Dance Video : नवरीचा डान्स बघून सासरच्या मंडळींना फुटला घाम; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाला बाई जरा थांब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:54 IST

New Brides Dance Video : नववधूने आपल्या रिसेप्शनमध्ये असा डान्स केला की सर्वजण बघतच राहिले. साडीवरच वधूने सूर्यनमस्कार घातला.  .

लग्न म्हटलं की नाच गाणं आलचं. असा कोणताही विवाह सोहळा नसेल ज्यात लोकं नाचत नाहीत. सोशल मीडियावर डान्सच्या व्हिडिओंचा बोलबाला आहे. सध्या एका नववधूनं केलेला डान्स तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये स्वागताचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वजण वधूला नाचायला सांगतात.  नववधू इतकी उत्साहात नाचेल अशी कोणाला कल्पनाही नसेल. (New brides dance video)

डोक्यावर घुंघट घेतलेल्या महिला, घुंघटच घेतलेली बहू आणि घरगुती कार्यक्रम असं स्वरुप असलेला हा व्हिडिओ. मात्र अचानक नवी नवरी असा काही तुफान डान्स आणि व्यायामप्रकारच दाखवायला लागते की पाहणारे चकीत होतात. आता व्हायरल झालेले ते नृत्य पाहून अनेकांना  भुलभुलैया चित्रपटातील मंजुलिकाची आठवण आली.

लोकलमध्ये बसल्या बसल्या पोरीनं समोरच्या आजींचं हुबेहूब चित्र काढलं; फोटो पाहून तुम्हीही कौतुक कराल

या व्हिडिओला खुप पसंत केले जात आहे. पण सासरची मंडळी हा व्हिडिओ पाहून नाराज झाल्याचं दिसून येत आहे. नेटकरी तिची प्रशंसा करत आहेत तर नवरीचा डान्स  व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल