पुर्वीच्या काळी वधुपरिक्षा करताना मुलीला सुईमध्ये दोरा ओवून दाखवावा लागायचा. जी मुलगी अगदी झटपट सुईमध्ये दोरा ओवून दाखवेल त्या मुलीचे डोळे चांगले आहेत, ती मुलगी चुणचुणीत आणि कामात हुशार असावी, असे समजले जायचे. आता तो जमाना गेला असला तरी सुई आणि दोरा मात्र आहेच.. आता शिलाईमशिन आले असले तरी बारीकसारीक कापडांना टिपा मारायला, शर्टची तुटलेली गुंडी लावायला, कधीतरी गजरा किंवा देवासाठी हार करताना सुईमध्ये दोरा ओवावा लागतोच (needle thread trick). अशावेळी मग खूपच पंचाईत होते. कारण इतकं बारीक पाहायची सवय नसते. वयस्कर मंडळींना तर जरा जास्तच त्रास होतो (how to fix thread in needle?). म्हणूनच आता तुमचा हा त्रास कमी करून अवघ्या काही सेकंदात सुईमध्ये दोरा ओवायचा असेल तर ही एक भन्नाट ट्रिक पाहा..(viral trick of fixing thread in needle)
सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी भन्नाट देसी जुगाड
एका अतिशय वेगळ्या पद्धतीने सुईमध्ये दोरा एका झटक्यात कसा ओवायचा याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ factoversee1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
मिक्सरच्या भांड्याचे ब्लेड बोथट झाले? 'या' टाकाऊ वस्तूंनी लावा धार-वाटण होईल मस्त
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका टुथब्रशची आणि टुथपिकची किंवा मग सेप्टीपिनची गरज पडणार आहे.
सगळ्यात आधी एक टुथब्रश घ्या. त्या ब्रशच्या ब्रिसल्सवर तुम्हाला जो दोरा सुईमध्ये ओवायचा आहे तो टाका.
आता सुई घेऊन ती ब्रशच्या ब्रिसल्सवर जिथे दोरा टाकला आहे तिथे ठेवा आणि अलगदपणे खाली दाबा. सुईचे जे छिद्र असेल तिथून ब्रिसल्स आणि दोऱ्याचा काही भाग वर येईल.
चैत्रगौर हळदीकुंकू : पारंपरिक लूक करून झटपट तयार होण्यासाठी खास टिप्स- सगळ्यांपेक्षा सुंदर दिसाल
आता तो भाग टुथपिक किंवा मग सेप्टिपिनची मदत घेऊन अलगदपणे वर ओढून घ्या... झाला देसी जुगाड.. सुईमध्ये एका झटक्यात दोरा ओवला जाईल. एकदा नक्की ट्राय करून पाहा..