Join us

घरातले एकूणएक उंदीर कायमचे पळतील घराबाहेर, फक्त ५ रुपयांच्या तुरटीचा ‘असा’ करा उपाय-बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:25 IST

Rats Home Remedies: तुरटीचा वापर त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तुरटीच्या मदतीनं तुम्ही घरातील उंदीर सुद्धा बाहेर काढू शकता.

Rats Home Remedies: घरात उंदीर वाढले की, सगळ्यांनाच वैताग येतो. कारण उंदरांमुळे घरातील वस्तू खराब होतातच, सोबतच कपड्यांची सुद्धा वाट लागते. धान्य, भाजीपाला सुद्धा कुरतडल्यामुळे फेकून द्यावा लागतो. अशात उंदीर पकडण्यासाठी फक्त पिंजरा लावून भागत नाही. उंदीर घरातून पळवून लावण्यासाठी एकापेक्षा जास्त उपाय करावे लागतात, तेव्हाच फायदा मिळू शकतो. असाच खास आणि स्वस्त उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सामान्यपणे तुरटीचा (Alum For Rats) वापर त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तुरटीच्या मदतीनं तुम्ही घरातील उंदीर सुद्धा बाहेर काढू शकता. यासाठी तुरटी कशी वापराल हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तुरटीची पावडर

तुरटीची पावडर किंवा वडी तुम्हाला बाजारात खूप कमी पैशात मिळू शकते. जी उंदीर पळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कारण तुरटीचा गंध आणि टेस्ट उंदरांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे जर त्यांना त्यांच्या रस्त्यात तुरटी दिसली तर ते त्यांचा मार्ग बदलतात.

अशात घरातील उंदीर पळवून लावण्यासाठी तुरटीचा वापर करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुरटीची पावडर. ५ रूपयांची तुरटीची पावडर खरेदी करा. हे पावडर तुमच्या घराच्या मेन गेटच्या आजूबाजूला टाका. त्यानंतर जिथे उंदीर येतात तिथे टाका. उंदीर घरातून बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही.

इतरही काही उपाय

कांदा

उंदरांना पळवून लावण्यासाठी कांदा सुद्धा खूप फायदेशीर ठरतो. उंदरांना कांद्याचा उग्र वास अजिबात सहन होत नाही. अशात घरातील काना-कोपऱ्यात कांदा कापून किंवा ठेचून ठेवा. याच्या वासानं उंदीर घरातून पळून जातील.

बेकिंग सोडा

घरातील उंदीर पळवून लावण्यासाठी एक कप साखर, एक कप बेकिंग सोडा, एक कप पीठ किंवा कॉर्नमीन आणि थोडं चॉकलेट पावडर घेऊन पेस्ट तयार करा. या पेस्टच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करा. या बेकिंग सोडा बॉल्सनं उंदीर मरतात. फक्त हे घरात ठेवत असताना लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घ्यावी.

काळी मिरीचं पाणी

उंदरांना पळवून लावण्यासाठी काळी मिरी देखील फायदेशीर ठरते. काळी मिरीचा गंध उंदरांना आवडत नाही. अशात काळी मिरीचं पाणी उंदरांवर शिंपडू शकता किंवा घरात उंदीर जिथे असू शकतात त्या ठिकाणी हे पाणी शिंपडा. उंदीर लगेच घराबाहेर पळून जातील.

टॅग्स :होम रेमेडीहेल्थ टिप्ससोशल व्हायरल