स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आले आणि गॉसिपही भरपूर सुरु झालं.पलाशने स्मृतीला धोका दिल्याच्या चर्चांनी वेग धरला. अजूनही स्मृतीकडून किंवा पलाशकडून काहीही स्टेटमेंट आले नसल्याने सध्या जर - तरच्याच गोष्टी सुरु आहेत. (Natasha and Palash's singing video goes viral on social media again after divorce with Hardik Pandya)पण एक गाणं यासाऱ्यात व्हायरल झालं आणि त्याचे शब्द बदलून आता त्याविषयी चर्चा होते आहे. दुनिया रखूं जुतों के निचे असे शब्द असलेले गाणे, काहींनी कुडियां रखू जुतो के निचे अशी वृत्ती असल्याचे म्हणत व्हायरल केले आहे.
त्यातच अचानक व्हायरल झालेल्या एका जुन्या व्हिडिओने गायक-संगीतकार पलाश मुच्छल यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. नताशा स्टँकोविकसोबत कारमध्ये बसून गाणी म्हणत मजा करतानाचा त्यांचा जुना व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर फिरू लागला आणि त्याच वेळी पलाश यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नवी चर्चा सुरु झाली. हार्दिक पांड्या आणि नताशा यांची लव्हस्टोरीही फार चर्चेचा विषय झाली होती. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. अजूनही त्यांच्याबद्दल सोशल मिडियावर रिल्स आणि चर्चा असतेच.
आता नताशा आणि पलाशचा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होतो आहे. या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट सतत लक्षात येते की व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यातील कोणत्याही घटनेवर सोशल मीडिया तात्काळ प्रतिक्रिया देतो, कधी सहानुभूतीने तर कधी अवाजवी तर्कांनी. नात्यांमधील चढ-उतार असोत किंवा आरोग्यासंबंधी सोशल मिडियावर एकदा का नाव खराब झाले की सगळ्या गोष्टींचा विचार उलटाच केला जातो. पलाश - स्मृती यांची द आयकॉनिक कपल म्हणून वाह - वाह होत होती. आणि सध्या स्मृती वाचली हे एकच वाक्य सोशल मिडियावर फिरत आहे. आता सोशल मिडियावर स्मृती - पलाशच्या चर्चेत नताशा - हार्दिक यांचे नावही जोडले जाते आहे. नक्की प्रकार काय घडला ते तर वेळच सांगेल.
