Lokmat Sakhi >Social Viral > मुंबईत घर, पगार हवा फक्त १ कोटी! नवरा कसा हवा, तरुणीच्या अपेक्षांची यादी व्हायरल

मुंबईत घर, पगार हवा फक्त १ कोटी! नवरा कसा हवा, तरुणीच्या अपेक्षांची यादी व्हायरल

Mumbai woman with 4 LPA salary seeks groom who earns 'at least 1 crore, is surgeon or CA' : ती म्हणते ‘असा’ नवरा हवा, तर पाठवा स्थळ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2024 05:05 PM2024-04-03T17:05:07+5:302024-04-03T17:06:08+5:30

Mumbai woman with 4 LPA salary seeks groom who earns 'at least 1 crore, is surgeon or CA' : ती म्हणते ‘असा’ नवरा हवा, तर पाठवा स्थळ..

Mumbai woman with 4 LPA salary seeks groom who earns 'at least 1 crore, is surgeon or CA' | मुंबईत घर, पगार हवा फक्त १ कोटी! नवरा कसा हवा, तरुणीच्या अपेक्षांची यादी व्हायरल

मुंबईत घर, पगार हवा फक्त १ कोटी! नवरा कसा हवा, तरुणीच्या अपेक्षांची यादी व्हायरल

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. बऱ्याच घरांमध्ये इच्छुक वर-वधूंचे बायोडेटा सर्वत्र फिरत आहे (Wedding Season). बायोडेटा आवडला तर, पुढची बोलणी करायला मुलगा-मुलगी एकमेकांना भेटतात (Social Viral). सगळ्याच गोष्टी जुळल्यानंतर घरचे मिळून लग्न ठरवतात. बायोडेटामध्ये इच्छुक वर-वधू आपल्या पार्टनरकडून असणाऱ्या अपेक्षा लिहितात. पुढे हा बायोडेटा फॅमेलीमध्ये पाठवला जातो. काहींच्या आपल्या पार्टनरकडून अनेक अपेक्षा असतात. काहींना चांगली नोकरी, चांगला पगार असणाऱ्या पार्टनरची अपेक्षा असते. पण सध्या एका महिलेचा बायोडेटा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

३७ वर्षीय महिलेच्या बायोडेटामध्ये तिने, आपल्या पार्टनरकडून अजब मागण्या केल्या आहेत. यात तिने वराला १ कोटीचं पॅकेज असावं, यासह इतर हाय-फाय मागण्या केल्या आहेत. तिच्या या मागण्या पाहून इच्छुक वरांना घाम तर फुटलाच आहे, शिवाय नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं(Mumbai woman with 4 LPA salary seeks groom who earns 'at least 1 crore, is surgeon or CA').

'ज्याच्यापाशी गाडी बंगला, असा मालदार पोरगा चांगला'

लव्ह मॅरेजमध्ये मुला-मुलीचे एकमेकांकडून अधिक अपेक्षा नसतात. पण अरेंज पद्धतीने लग्न करणाऱ्यांना बऱ्याच प्रकारच्या अपेक्षांना सामोरे जावे लागते. होणाऱ्या जोडीदाराकडून काही ठराविक अपेक्षा ठेवण्यात गैर काहीच नाही. पण अपेक्षांना देखील काही मर्यादा असतात, हे काही लोक विसरतात. मग अशावेळी 'रुको जरा, सबर करो' असं म्हणण्याची वेळ येते.

सोशल मिडीयावर सध्या एका बायोडेटाचा फोटो व्हायरल होत आहे. ३७ वर्षीय मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या महिलेने तिच्या भावी पतीकडून अजब अपेक्षा ठेवल्या आहेत. तिने बायोडेटामध्ये..

- वर विदुर/व्यंग असल्यास नको.

शरीरात होणारे ५ बदल देतात लिव्हर डॅमेजचे संकेत! वेळीच ओळखा - टळेल नुकसान

- मुलगी १० वर्षांपासून नोकरीनिमित्त मुंबईत असल्यामुळे, मुलाचं मुंबईतच घर असावं.

- घर, नोकरी, व्यवसाय असणाऱ्या वराला अधिक प्राधान्य.

- मुलगा उच्च शिक्षित असावा. (एमबीबीएस-सर्जन/ सीए असल्यास स्वतःची फर्म असणारा हवा).

- किंवा इतर एडुकेशनल बँकग्राऊँडमधला असेल तर, वरिष्ठ पोझिशन मिळवलेला असावा.

- स्वतःचे घर असणे आवश्यक.

- मुलाची मिळकत वार्षिक किमान १ कोटी + असावे.

- परदेशात राहणारा असल्यास युरोपला प्राधान्य. खासकरून इटली हा देश नक्कीच चालेल.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शाळांमध्ये मुलांना मिळणार ३ वॉटर ब्रेक; या ब्रेकमागचा हेतू काय? मुलांनी दिवसभरात नेमकं किती पाणी प्यावं?

मुलगा-मुलगीने आपल्या पार्टनरकडून अपेक्षा ठेवाव्यात. पण इतकेही नको, की त्याचं चारचौघात हसू व्हावं. सध्या या महिलेचा बायोडेटा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात काही नेटकऱ्यांनी अपेक्षांची प्रशंसा करत सध्याच्या काळात पगाराची अट वगळता इतर अपेक्षांमध्ये गैर काय असा सवाल केला. तर काहींनी वयाच्या ३७ व्या वर्षी इतक्या अपेक्षा ठेवणं म्हणजेच नात्याची सुरुवातच अपेक्षाभंगानं करण्याची सूचक प्रतिक्रियाही दिली.

Web Title: Mumbai woman with 4 LPA salary seeks groom who earns 'at least 1 crore, is surgeon or CA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.