Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > "अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या

"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या

Mudrika Kavdia : तरुणीने अलीकडेच सोशल मीडियावर कामाच्या ठिकाणचा एक हृदयस्पर्शी अनुभव शेअर केला आहे. तिने सहजपणे आंब्यांची आठवण येत असल्याचं म्हटल्यावर, तिच्या डायरेक्टरनी थेट तिच्या घरी आंब्याच्या पेट्या पाठवल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:34 IST2026-04-12T14:32:29+5:302026-04-12T14:34:07+5:30

Mudrika Kavdia : तरुणीने अलीकडेच सोशल मीडियावर कामाच्या ठिकाणचा एक हृदयस्पर्शी अनुभव शेअर केला आहे. तिने सहजपणे आंब्यांची आठवण येत असल्याचं म्हटल्यावर, तिच्या डायरेक्टरनी थेट तिच्या घरी आंब्याच्या पेट्या पाठवल्या.

Mumbai woman Mudrika Kavdia says boss sent mangoes after she mentioned missing them ‘God bless such leaders’ | "अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या

"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या

मुंबईतील एका तरुणीने अलीकडेच सोशल मीडियावर कामाच्या ठिकाणचा एक हृदयस्पर्शी अनुभव शेअर केला आहे. तिने सहजपणे आंब्यांची आठवण येत असल्याचं म्हटल्यावर, तिच्या डायरेक्टरनी थेट तिच्या घरी आंब्याच्या पेट्या पाठवल्या. या घटनेने इंटरनेटवर सर्वांचच लक्ष वेधून घेतलं असून अनेकजण या विचारशील कृतीचं आणि दयाळू नेतृत्वाचं भरभरून कौतुक करत आहेत. मुद्रिका कावडिया नावाच्या या तरुणीने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आणि आपल्या डायरेक्टरप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मुद्रिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "परवा एका मीटिंगमध्ये मी माझ्या डायरेक्टरना सहज सांगितलं की, आमच्या गावी अजूनही चांगले आंबे मिळत नाहीत आणि मी व माझी आजी आंब्यांना खूप मिस करत आहोत. ते स्वतः सध्या लंडनमध्ये आहेत आणि मूळचे मुंबईचे आहेत. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांनी कोणाकडून तरी माझ्या घरी आंब्याच्या दोन पेट्या पाठवून दिल्या. अशा बॉसना देव सुखी ठेवो."

पोस्टसोबत मुद्रिका कावडियाने तिच्या घरी आलेल्या आंब्याच्या पेट्यांचा फोटोही शेअर केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली असून आतापर्यंत ४,००० हून अधिक लोकांनी ती पाहिली आहे. अनेक युजर्सनी यावर प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या असून बॉस ग्रेट असल्याचं म्हटलं आहे.

एका युजरने लिहिलं, "त्या डायरेक्टरचं भलं होवो, आणि असेच डायरेक्टर माझ्या आयुष्यातही येऊ दे." दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, "मला तुमचा हेवा वाटतोय, असे लोक खरोखरच हिरे असतात. हे पाहून ९० च्या दशकातील आठवणी ताज्या झाल्या." तिसऱ्या एका व्यक्तीने आनंद व्यक्त करत लिहिलं, "वा! तुम्ही खूप नशीबवान आहात." तर आणखी एकाने म्हटलं, "मलाही असाच बॉस हवा आहे. हे खूपच भारी आहे." याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. 
 

Web Title : उदार बॉस ने कर्मचारी को भेजे आम, दिल छू लेने वाला इशारा वायरल।

Web Summary : मुंबई की एक महिला कर्मचारी ने बताया कि आमों की याद आने पर उसके बॉस ने लंदन से उसके घर आमों के बक्से भेजे। इस दिल छू लेने वाले इशारे की खूब सराहना हो रही है।

Web Title : Generous boss sends mangoes to employee, heartwarming gesture goes viral.

Web Summary : Mumbai woman's boss, upon learning she missed mangoes, sent boxes to her home from London. The heartwarming gesture has gone viral, praised for its thoughtfulness and kind leadership.