Join us  

'प्रीती, चुन्नी ठीक करो', व्हायरल होतंय मुंबई पोलिसांचं ट्विट; महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनोखा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 2:01 PM

Mumbai police tweet : या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याशिवाय इतर चित्रपटातील मागास दृष्टीकोन दर्शवत असले्ल्या डायलॉग्सचा वापर करत पोलिसांनी लोकांपर्यंत माहिती पोहोचवली आहे.  

मुंबई पोलिस (Mumbai Police) नेहमीच नागरिकांना जागरूक करण्यासाठी आणि नियमांची आठवण करून देण्यासाठी सोशल मीडियावरून संदेश देत असतात. अलिकडेच त्यांनी महिलांच्या सुरक्षितेबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी  कबीर सिंग चित्रपटातील अभिनेत्री कियारा अडवानी आणि शाहिद कपूर यांच्यातील संवादाचा वापर करत महत्वाचा संदेश दिला आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स सध्या प्रचंड चर्चेत आहेत.   याशिवाय इतर चित्रपटातील मागास दृष्टीकोन दर्शवत असले्ल्या डायलॉग्सचा वापर करत पोलिसांनी लोकांपर्यंत माहिती पोहोचवली आहे.  

या ट्विटच्या कॅप्शनमध्ये नमूद केलंय की, (Cinema is a reflection of our society)  चित्रपट आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहेत. काही संवाद  असे आहेत ज्यााचा आपला समाज आणि सिनेमा या दोन्हीदृष्टीनं गोष्टींवर विचार करणे आवश्यक आहे.  बोलताना आणि कृती करण्यापूर्वी विचार करा. कायदा हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत! #LetsNotNormaliseMisogyny, #MindYourLanguage, #WomenSafety हे हॅशटॅग्स वापरले आहेत. 

अनेकदा चित्रपटातून बायकांविषयी चुकीचं मत पसरवलं जातं. उदा. 'चुन्नी ठीक करो, तुम एक पत्नी  हो, तुम्हाला पती जैसा चाहेगा वैसाही होगा', अशा प्रकारचे डायलॉग्स महिलांवर बंधन घालण्याचा दृष्टीकोन दर्शवतात. यातूनच घरगुती हिंसाचार वाढू शकतो. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यास कायद्याचा हस्तक्षेप अटळ आहे.

त्यामुळे पोलिसांनी लोकांना वैयक्तीक जीवनात जोडप्यांमधील नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी, भांडण टाळण्यासाठी खबरदारीचे आवाहन केलं आहे. शब्द जपून वापरायला हवेत असाही संदेश पोलिसांनी यावेळी दिला आहे. मुंबई पोलिसांनी ३० सप्टेंबरला सकाळी साडे दहाच्या दरम्यान हे ट्विट केलं.  खूप कमी वेळातच हे फोटो तूफान व्हायरल झाले. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांनी या फोटोवर लाईक केले आहे. कमेंट्समध्ये नेटिझन्सनी मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :मुंबई पोलीसपोलिसमहिलासोशल मीडियासोशल व्हायरल