Join us

वाह, मानलं! लेकाची हिम्मत पाहून ६२ वर्षांच्या आईनंही सर केले उंच शिखर; पाहा जबरदस्त व्हिडिओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:56 IST

62 वर्षीय नागरत्नम्मा डोंगरावर चढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या साडी नेसून दोरीच्या साहाय्याने वर चढताना दिसत आहे.

'वय म्हणजे फक्त एक आकडा' या म्हणीचं जिवंत उदाहरण या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.  ६२ वर्षीय आजी आपली निर्भयता आणि धाडसामुळे इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. जुन्या विचारसरणीला छेद देत बंगळुरूच्या ६२ वर्षीय नगरत्नम्मा यांनी अगस्त्य कूडमवर  चढाई केली. हे शिखर 1,868 मीटर (6,129 फूट) उंच आहे, जे केरळमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.

62 वर्षीय नागरत्नम्मा डोंगरावर चढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या साडी नेसून दोरीच्या साहाय्याने वर चढताना दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शननुसार, 16 फेब्रुवारीला त्या बंगळुरूहून त्यांचा मुलगा आणि मित्रांसह रोप क्लाइंबिंगला गेल्या  होत्या. हा व्हिडिओ विष्णू नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

विष्णूने त्याच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'अगस्त्य कूडम'. सह्याद्री पर्वत रांगेतील हा सर्वात उंच आणि अवघड ट्रेकिंग टेकड्यांपैकी एक आहे. नगरत्नम्मा 16 फेब्रुवारी 2022 रोजी दोरीच्या साहाय्याने टेकडीवर चढल्या. 

विष्णू पुढे म्हणाले, 'कर्नाटकाबाहेरचा हा त्यांचा पहिला दौरा आहे. लग्नानंतर गेली 40 वर्षे कौटुंबिक जबाबदारीत व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. आता त्यांची सर्व मुलं मोठी झाली आहेत आणि स्थायिक झाली आहेत. नगरत्नम्मा यांच्या  उत्साहाची आणि उर्जेची कोणीही बरोबरी करू शकत नाही. त्याच्या चढाईचे साक्षीदार असलेल्या सर्वांसाठी हा सर्वात प्रेरणादायी आणि समृद्ध करणारा अनुभव होता.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी त्यांच्यावर जोरदार कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिले, 'अमेझिंग पॉवर आणि एनर्जी'. तर दुसर्‍या युजरने लिहिले की, 'Hello incredible, you can more inspiration'. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक हार्ट इमोजीसह प्रेम व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल