Join us

धक्कादायक! पाच लाख रुपयांना पोटचे १५ दिवसांचे बाळ विकून आईनं खरेदी केला फ्रिज अन् कुलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:46 IST

Mother Bought a Refrigerator Selling baby :  एका आईने आपले 15 दिवसांचे नवजात बालक विकले इतकंच नाही तर मुलाला विकून मिळालेल्या पैशातून आईने फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन यांसारख्या वस्तू खरेदी केल्या.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये ( Indore) आईच्या मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.  एका आईने आपले 15 दिवसांचे नवजात बालक विकले इतकंच नाही तर मुलाला विकून मिळालेल्या पैशातून आईने फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन यांसारख्या वस्तू खरेदी केल्या. आरोपी आईने पतीच्या संमतीने हा व्यवहार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. (Mother bought a refrigerator after selling a 15- day old innocent baby)

समोर आलेल्या माहितीनुसार, इंदूरच्या हीरा नगर भागात राहणाऱ्या शायना बी या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीला मुलाच्या जन्माबाबत संशय होता. महिलेने सांगितले की, 'माझ्या पतीला गर्भपात करायचा होता पण जास्त दिवस होऊन गेल्यानं गर्भपात  न करता दलालांमार्फत मूल विकण्याची योजना आखली आणि ते मूल देवास येथील एका जोडप्याला विकले.' पोलिसांनी सांगितले की, बाळ विकत घेतलेल्या महिलेचे  नाव लीना आहे. लीनाने सांगितले की, अलीकडेच तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी या १५ दिवसांच्या मुलाला साडेपाच लाखांना विकत घेतले.

लग्नाच्या दिवशी होणाऱ्या बायकोला पाहताच भावूक झाला नवरदेव; पाहूण्यांनी दिली 'अशी' रिएक्शन

पोलिसांनी सांगितले की, मुलाची विक्री केल्यानंतर मिळालेल्या पैशातून महिलेने टीव्ही, फ्रीज, कुलर आणि वॉशिंग मशीन या वस्तू खरेदी केल्या होत्या, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, 'सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही बाब कळवण्यात आली. 

घरात वाय-फाय लावताना 5 ट्रिक्स लक्षात ठेवा; स्पीड वाढून मिळेल उत्तम कनेक्टिव्हीटी

याप्रकरणी आरोपी आई शायना बी हिच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एक अल्पवयीनही आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन सध्या फरार आहेत.लवकरच फरार आरोपींनाही जेरबंद करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलगुन्हेगारी