पावसाळा संपत आला की डासांचा पैलाव जास्त होतो. कारण पावसामुळे साठलेले पाणी , चिखल, कचरा म्हणजे डासांसाठी अगदी आवडीची जागा. त्यातून डासांची संख्या वाढते. त्यामुळे पावसानंतर डासांमुळे अनेक आजार पसरतात.(Mosquitoes won't trouble you, follow these 3 simple steps, you will not see a single mosquito in your house - no need to fear dengue malaria) फक्त संध्याकाळी दारं-खिडक्या लावल्याने फायदा होत नाही. घराजवळचा डासांचा फैलाव बंद करायला हवा. त्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करणे सोपे आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे घर आणि अंगणाभोवती स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
१. घराजवळ, छपरावर, बाल्कनीत, बागेत किंवा पाणी साचण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही जागेत साचलेले पाणी काढून टाका. पाणी साचतच असेल तर मग त्या पाण्यात जंतुनाशक घालून ठेवा. फुलांच्या कुंड्यांच्या प्लेट्स, जुने टायर, बादल्या, पाण्याच्या टाकीचे झाकण नीट लावलेले आहे का हे रोज तपासावे. जर पाणी साचले असेल तर ते तात्काळ काढून जागा कोरडी ठेवावी.
२. संध्याकाळच्या वेळी जसा अंधार वाढत जातो तसे हे डास घराच्या दिशेने यायला लागतात. अशावेळी सगळ्यात मस्त उपाय म्हणजे धुरी करणे. त्यात चोडी, लाकूड, कापूर, गोवऱ्या अशा गोष्टी घालायच्या.
घरगुती उपाय म्हणून, पाण्याच्या टाक्या किंवा कुंड्यांमध्ये खोबरेल तेल टाकले तर पाण्यावर पातळ थर तयार होतो, ज्यामुळे डासांची अळ्या त्यात तयार होत नाहीत.
३. लिंबाचा रस किंवा नीलगिरीचे तेल पाण्यात मिसळून फवारणी केल्यासही डास कमी होतात. नीलगिरीचा वास आपल्या आरोग्यासाठी चांगला आणि किटकांसाठी त्रासदायक ठरतो. अंगणात किंवा खिडकीजवळ तुळस, झेंडू किंवा पुदिन्याची लागवड केली तर त्यांचा सुगंध डासांना आवडत नाही. ते दूर राहतात.
हे सारे उपाय जर कामी येत नसतील तर घरात एकदा औषध फवारणी करुन घ्यावी. आजकाल हर्बल फवारणी उपलब्ध असते. त्यामुळे फवारणीचा त्रासही होत नाही. डासांच्या फैलावामुळे येणाऱ्या आजारपणावर नंतर उपचार घेण्यापेक्षा आधीच फैलाव थांबवा आजारपण टाळता येते.