Lokmat Sakhi >Social Viral > काठापदराच्या साड्या-कपाळी कुंकू-केसांत गजरा, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक पोहोचल्या थेट ‘या’ मंदिरात! पाहा फोटो

काठापदराच्या साड्या-कपाळी कुंकू-केसांत गजरा, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक पोहोचल्या थेट ‘या’ मंदिरात! पाहा फोटो

Miss World 2025 Contestants Visited South Indian Temples: मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धकांचं भारतीय वेशभुषेतलं सौंदर्य सध्या जगाला भुरळ घालत आहे. त्याचीची एक झलक...(Miss World 2025 contestants in traditional Indian look)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 16:50 IST2025-05-17T16:09:33+5:302025-05-17T16:50:44+5:30

Miss World 2025 Contestants Visited South Indian Temples: मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धकांचं भारतीय वेशभुषेतलं सौंदर्य सध्या जगाला भुरळ घालत आहे. त्याचीची एक झलक...(Miss World 2025 contestants in traditional Indian look)

Miss World 2025 contestants visited south indian temples in Indian sarees, bangles and gajras | काठापदराच्या साड्या-कपाळी कुंकू-केसांत गजरा, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक पोहोचल्या थेट ‘या’ मंदिरात! पाहा फोटो

काठापदराच्या साड्या-कपाळी कुंकू-केसांत गजरा, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक पोहोचल्या थेट ‘या’ मंदिरात! पाहा फोटो

Highlightsत्यांनी दक्षिण भारतीय पद्धतीने साडी नेसू मंदिरात होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागही घेतला.

मिस वर्ल्ड स्पर्धा म्हटली की जगभरातल्या सौंदर्यवती तिथे दिसून येतात. आपपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत जगभरातील जनतेची मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न करतात. आताही Miss World 2025 या स्पर्धेच्या काही फेऱ्या सुरू असून त्यापैकीच एका कार्यक्रमाचा भाग म्हणून स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धक सौंदर्यवती दोन दिवसांपुर्वी दक्षिण भारतात येऊन गेल्या. तिथल्या विविध स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यादरम्यान त्या सगळ्यांनीच खास दाक्षिणात्य वेशभुषा केली होती. काठपदर साड्या, केसांमध्ये गजरे, कपाळावर टिकली, हातात बांगड्या अशा थाटात नटलेल्या सगळ्याच जणी अतिशय देखण्या दिसत होत्या. त्यामुळेच तर त्यांचे फोटो सध्या सोशल मिडियावर अतिशय व्हायरल झाले असून त्याचीच ही एक झलक पाहा..(Miss World 2025 contestants in traditional Indian look)

 

Miss World 2025 स्पर्धेतील सौंदर्यवतींचं भारतीय रूप

सौंदर्यवतींनी ट्रिपच्या पहिल्या दिवशी यडगिरीगुट्टा येथील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी मंदिराचा इतिहास जाणून घेतला आणि बराच वेळ मंदिराच्या आवारात घालवला. यावेळी त्यांनी दक्षिण भारतीय पद्धतीने साडी नेसून दिपआराधना या मंदिरात होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागही घेतला.

पिठलं खमंग-झणझणीत होत नाही? ‘ही’ रेसिपी घ्या, पिठलं होईल चविष्ट, गाठी-गोळेही होणार नाहीत..

दक्षिण आफ्रिकेतल्या काही सौंदर्यवतींनी पोचमपल्ली साडी कशी तयार केली जाते, याची माहिती घेतली आणि ती साडी नेसूनही पाहिली. यानंतर या स्पर्धकांनी युनेस्को हेरिटेज साईट अशी ओळख असणाऱ्या प्राचीन रामप्पा मंदिराला भेट दिली.

 

मंदिरात जाण्यापुर्वी पाय धुणे या प्रथेची त्यांना मोठीच गंमत वाटली. त्यांच्यासाठी पाय धुण्याची विशेष वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. पाय धुवून मंदिरात प्रवेश करताना अनेक जणी अतिशय आनंदी झालेल्या दिसून आल्या.

 

मंदिराचा इतिहास समजून घेणे, त्यावरचे जुने नक्षीकाम पाहाणे, भारतीय लोकांप्रमाणे खाली झुकून देवाचे दर्शन घेणे, महादेवाच्या मंदिराबाहेर असणाऱ्या नंदीच्या कानात आपली इच्छा सांगणे

केसांवर मेहंदी, डाय लावायला नको वाटते? 'हा' घरगुती हर्बल रंग लावा- पांढरे केस होतील काळे

अशा सगळ्या लहानसहान गोष्टी त्यांनी मनापासून एन्जॉय केल्या. या सगळ्या भारतीय परंपरांचा आनंद प्रत्येक फोटोतून त्यांच्या चेहऱ्यावरून झळकताना दिसतो. 
 

Web Title: Miss World 2025 contestants visited south indian temples in Indian sarees, bangles and gajras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.