Lokmat Sakhi >Social Viral > मी बाजारात उभी नाही! मिस इंग्लंडने सोडली मिस वर्ल्ड स्पर्धा, मनोरंजनासाठी वाट्टेल ते...

मी बाजारात उभी नाही! मिस इंग्लंडने सोडली मिस वर्ल्ड स्पर्धा, मनोरंजनासाठी वाट्टेल ते...

Miss England leaves Miss World competition in the middle, reason is : भारतात चालू असलेल्या मिस वर्ल्ड पेजेंटची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र कारण काही औरच आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2025 11:06 IST2025-05-25T11:01:54+5:302025-05-25T11:06:00+5:30

Miss England leaves Miss World competition in the middle, reason is : भारतात चालू असलेल्या मिस वर्ल्ड पेजेंटची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र कारण काही औरच आहे.

Miss England leaves Miss World competition in the middle, reason is.. | मी बाजारात उभी नाही! मिस इंग्लंडने सोडली मिस वर्ल्ड स्पर्धा, मनोरंजनासाठी वाट्टेल ते...

मी बाजारात उभी नाही! मिस इंग्लंडने सोडली मिस वर्ल्ड स्पर्धा, मनोरंजनासाठी वाट्टेल ते...

यंदाचे ७२वे मिस वर्ल्ड पेजेंट भारतात होत आहे. तेलंगणा या राज्यात जगभरातून सौंदर्यवतींचे स्वागत करण्यात आले. ४ मे ते ३१ मे या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. (Miss England leaves Miss World competition in the middle, reason is)जगातील विविध देशांमधून १२० महिलांनी मिस वर्ल्ड पेजेंटसाठी नावं नोंदवली आहेत. त्यांच्यापैकीच एक म्हणजे इंग्लंडमधून आलेली मिला मॅगी. ती जरी पेजेंटमध्ये भाग घेऊन जिंकण्यासाठी आली असली तरी, मिस वर्ल्ड पेजेंट मध्येच सोडून मिस इंग्लंड पुन्हा तिच्या देशात परत गेली. असा प्रकार सहसा घडत नाही. स्पर्धेपेक्षा जास्त चर्चा सध्या मिलाची होत आहे. मिलाने केलेल्या काही टीकांमुळे आणि स्पर्धा सोडण्याच्या कारणामुळे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. 

२०२४ ची मिस इंग्लंड मिला मॅगी ही २४ वर्षाची असून कॉर्नवॉल येथील लाइफगार्ड आणि एक छान सर्फर आहे. 'गो फार विथ सिपीआर' हा उपक्रम मिला राबवत आहे. मात्र १६ मे २०२५ ला तिने तिचे नाव मिस वर्ल्ड पेजेंटमधून काढून घेतले. ९Miss England leaves Miss World competition in the middle, reason is)मिलाच्या परतीचे आधी कळलेले कारण तिच्या आईची तब्येत बरी नाही असे होते. त्यामुळे तिच्या परतीची चर्चा जास्त झाली नाही. आईची तब्येत बरी नाही म्हणून हैद्राबादवरुन तिला तिच्या घरी पाठवण्याची सोयही लगेच केली गेली.  मात्र नंतर तिने असे काही वक्तव्य केले ज्यामुळे सौंदर्य स्पर्धांमधील नैतिकता आणि त्यांच्यामार्फत सौंदर्यवतींना दिली जाणारी वागणूक नक्की योग्य आहे की नाही? असा प्रश्न जगभरातून विचारला जाऊ लागला. मिस इंग्लंडच्या पानावर सांगितल्यानुसार, मिलाच्या ऐवजी आता शार्लोट ग्रँट इंग्लंडचे प्रतिनिधित्व करेल.

मिला म्हणाली, "आयोजकांचे अनैतिक वागणे मला आवडले नाही. प्रायोजकांसमोर स्पर्धकांना मनोरंजनासाठी उभे केले जाते. त्यामुळे मला एक वैश्या असल्यासारखे वाटले. आयोजक आजही जुन्या विचारांचेच आहेत. भूतकाळात आडकलेले आहेत."

 मिलाच्या या वक्तव्यामुळे मिस वर्ल्ड पेजेंट २०२५ मध्ये नक्की काय घडत आहे? हा प्रश्न विचारला जात असून,  विविध चर्चांना जगभरातून चालना मिळत आहे. प्रायोजकांसमोर स्पर्धकांना असे मनोरंजनासाठी उभे करणे नक्कीच चुकीचे आहे, मात्र असा प्रकार खरंच घडतो का? असा ही प्रश्न मिडिया माध्यमांवर विचारला जात आहे.   

Web Title: Miss England leaves Miss World competition in the middle, reason is..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.