आजच्या काळात लोक दररोज लिफ्टचा वापर करतात. अनेकदा लिफ्टमध्ये आपल्याला आरसे दिसतात. पण हे आरसे का असतात याचा कधी विचार केला आहे का? लिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागे सायकोलॉजी आहे. लिफ्टमधील आरशांमुळे वेळ लवकर जातो असं दिसतं. लोक त्यांचे केस नीट करण्यात किंवा त्यांचा लूक चेक करण्यात इतके व्यस्त होतात की त्यांना त्यांचा फ्लोअर कधी आला हे कळत देखील नाही. लिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागील सायकोलॉजी जाणून घेऊया...
लिफ्टमध्ये आरसे लावण्याचा उद्देश लोकांना व्यस्त ठेवणं आणि लिफ्टच्या मर्यादित जागेपासून त्यांचं लक्ष विचलित करणं आहे. यामुळे क्लॉस्ट्रोफोबिया कमी होतो आणि मोठ्या प्रमाणात लिफ्टची भीती दूर होते.
लिफ्ट बंद असते आणि अरुंद जागा असतात ज्यामुळे अनेक लोकांना गुदमरल्यासारखं किंवा अस्वस्थ वाटू शकतं. म्हणूनच लोकांना स्वतःकडे पाहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि चांगलं वाटण्यासाठी लिफ्टमध्ये आरसे बसवले जातात.
आरशांमुळे तुम्हाला तुमच्या मागे आणि बाजुला असलेले लोक दिसतात, ज्यामुळे चोरीचा धोका कमी होतो. या कारणास्तव आता अनेक मॉल आणि इमारतींच्या लिफ्टमध्ये पूर्ण लांबीचे आरसे बसवले जातात, ज्यामुळे लोकांना त्यांच्या सभोवतालच्या परिसराचं निरीक्षण करता येतं.
लिफ्टचे आरसे केवळ सौंदर्यासाठीच नव्हे तर मनःशांतीसाठी, सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि जागा अधिक आरामदायक आहे हे दाखवण्यासाठी देखील बसवले जातात. लिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागील सायकोलॉजी खूप महत्त्वाची आहे.
