Mexico Crocodile Marriage Tradition: सामान्यपणे पुरूष आणि महिला यांचं लग्न होतं. काही लोक त्यांच्या पाळिव प्राण्यांचंही लग्न लावून देतात. पण तुम्ही एका मादा मगरीसोबत पुरूषाचं लग्न लावल्याचं ऐकलं नसेल. पण हे सत्य आहे. दक्षिण मेक्सिकोच्या सॅन पेड्रो हुआमेलुलाल शहराचे महापौर Daniel Gutierrez यांचं अलिकडेच एका मगरीसोबत लग्न लावून देण्यात आलं. या लग्नाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मगरीसोबत लग्न लावण्याची ही एक स्थानिक परंपरा आहे. जी स्थानिक चोंटल आणि हुआवे समूहात शांती प्रस्थापित होण्याच्या आठवणीत पार पाडली जाते. वाचून आश्चर्य वाटेल की, गेल्या तब्बल २०३ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या खास लग्नात स्थानिक लोक पूर्ण रितीरिवाज पार पाडतात आणि पूर्ण लग्नासारखं वातावरण असतं. यात लोक एन्जॉय करतात आणि डान्सही करतात.
दोन वर्षांआधी स्थानिक मेअर विक्टर ह्यूगो सोसा यांनी सुद्धा असंच लग्न केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'मी जबाबदारी स्वीकारतो. कारण आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. हे महत्वाचं आहे. तुम्ही प्रेमाशिवाय लग्न करू शकत नाही.'.
लग्न समारंभाआधी नवरी बनलेल्या मगरीला घराघरांमध्ये नेलं जातं. जेणेकरून स्थानिक लोक तिला जवळ घेऊ शकतील आणि तिच्यासोबत डान्स करू शकतील. या मगरीला लग्नासाठीचा खास गाउन घातला जातो. सुरक्षेसाठी तिचं तोंड दोरीनं बांधलं जातं.
लग्न मंडपात आल्यानंतर काही रितीरिवाज केले जातात. महापौर मगरीला किस करतात. त्यानंतर लोक जल्लोष करतात.