lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > कॅन्सरमधून सावरले पण १२ तास घाण पाण्यात शुटिंग करताना..! मनीषा कोईराला सांगते, माझा जीव तर..

कॅन्सरमधून सावरले पण १२ तास घाण पाण्यात शुटिंग करताना..! मनीषा कोईराला सांगते, माझा जीव तर..

Manisha Koirala recalls being immersed in water for 12 hours during this scene in Heeramandi: 'I was beyond exhaustion' : अभिनय आणि शुटींगदरम्यानच्या किस्स्यांबद्दल प्रीती झिंटाने मनीषाचं केलं 'दिल से' कौतुक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 03:44 PM2024-05-15T15:44:05+5:302024-05-15T16:00:41+5:30

Manisha Koirala recalls being immersed in water for 12 hours during this scene in Heeramandi: 'I was beyond exhaustion' : अभिनय आणि शुटींगदरम्यानच्या किस्स्यांबद्दल प्रीती झिंटाने मनीषाचं केलं 'दिल से' कौतुक..

Manisha Koirala recalls being immersed in water for 12 hours during this scene in Heeramandi: 'I was beyond exhaustion' | कॅन्सरमधून सावरले पण १२ तास घाण पाण्यात शुटिंग करताना..! मनीषा कोईराला सांगते, माझा जीव तर..

कॅन्सरमधून सावरले पण १२ तास घाण पाण्यात शुटिंग करताना..! मनीषा कोईराला सांगते, माझा जीव तर..

सध्या सोशल मिडीयावर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजची चर्चा होत आहे (Heeramandi). या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या वेब सिरीजमध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे अनेक वर्षांनी अभिनेत्री मनीषा कोईरालाला (Manisha Koirala) पाहून, चाहत्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

तिने साकारलेली 'मल्लिकाजान' हे पात्र लोकांना भावलं आहे. सध्या या सिरीजमधले कलाकार शूटिंगदरम्यान घडलेल्या अनेक गोष्टींचे खुलासे करीत आहे. ज्यात मनीषाने देखील अवघड सिन्स करतानाचे किस्से सोशल मीडियात शेअर केले आहे. कॅन्सर या मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा, शुटींग करणं हे कसं आव्हानात्मक ठरलं. याबद्दल मनीषाने सांगितले आहे(Manisha Koirala recalls being immersed in water for 12 hours during this scene in Heeramandi: 'I was beyond exhaustion').

मनीषाने आव्हानात्मक किस्स्यांबद्दल पोस्ट केली शेअर..

मनीषाने 'हीरामंडी' शूट दरम्यान घडलेल्या काही किस्स्यांबद्दल सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, 'माझ्या अभिनयाचे लोक कौतुक करीत आहे. हे सर्व पाहून मला आनंद होत आहे. त्यावेळी मला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ते पाहून मला आता माझ्या मेहनतीला यश आल्यासारखे वाटते. शूटिंगचे व्यस्त वेळापत्रक, जड दागिने, भरजरी पोशाख. या सगळ्या गोष्टी माझं शरीर सहन करू शकले का? याची शाश्वती मला नव्हती. पण ते शक्य झालं.'

अरे बापरे! ५ रुपयांच्या कुरकुरेवरून पती-पत्नीमध्ये वाद; उचलले टोकाचे पाऊल..म्हणतेय..

अवघड सीनबद्दल मनीषा म्हणते..

'या सिरीजमध्ये माझ्यासाठी सर्वात मोठा आव्हानात्मक कारंजाचा सीन होता. या सीनसाठी मला १२ तासाहून अधिक वेळ पाण्यात राहावे लागले. ही खरंतर माझ्यासाठी परीक्षाच ठरली. पण मी हार मानली नाही. कारंज्यामधलं पाणी कोमट होते, याची जाणीव मला आणि संजयला देखील होती. पण काही तासांतच पाणी घाण झाले कारण टीम मेंबर्स, सिनेमॅटोग्राफर आणि आर्ट डायरेक्टर यांना पुन्हा पुन्हा पाण्यात काम करावे लागत होते.'

मनीषा पुढे म्हणते, 'या घाण पाण्यात माझे संपूर्ण शरीर भिजले होते. शुटींगच्या शेवटी माझे शरीर पूर्ण थकले. पण माझ्या शरीराने इतका ताण आणि वेदना सहन केल्याबद्दल मला आनंद झाला.' अशा कॅप्शनेसहित मनीषाने पोस्ट सोशल मीडियात शेअर केली. या पोस्टवर अनेकांनी कमेण्ट करत मनीषाचं कौतुक केलं. ज्यात अभिनेत्री प्रीती झिंटाची कमेण्ट लक्षवेधी ठरत आहे.

मनीषाच्या पोस्टवर प्रीतीचं 'दिल से' कमेण्ट

FSSAI म्हणते 'या' पिठाच्या चपात्या खा; बीपीही नॉर्मल आणि हाडंही होतील मजबूत! पाहा कोणतं ते पीठ

प्रीतीने मनीषाच्या पोस्टवर कमेण्ट करत कौतुक केलं आहे. 'मी तुझ्यावर खूप प्रेम करते. हीरामंडीमध्ये जबरदस्त काम केलं आहेस. तू एक टॅलण्टचं पॉवरहाउस आहेस. तू एक उत्तम कलाकार आहेस, आणि त्याहून उत्तम व्यक्ती. मी आपला चित्रपट कधीच विसरू शकत नाही. 'दिल से' चित्रपटादरम्यान पहिल्या क्षणी जेव्हा मला तू मिठी मारलीस. प्रेमाने माझे स्वागत केले. तो क्षण अजूनही माझ्या आठवणींमध्ये ताजे आहेत. त्याकाळी मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. परंतु, तू मला कधी तसे भासवले नाहीस. खूप प्रेम.'

Web Title: Manisha Koirala recalls being immersed in water for 12 hours during this scene in Heeramandi: 'I was beyond exhaustion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.