lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अरे बापरे! ५ रुपयांच्या कुरकुरेवरून पती-पत्नीमध्ये वाद; उचलले टोकाचे पाऊल..म्हणतेय..

अरे बापरे! ५ रुपयांच्या कुरकुरेवरून पती-पत्नीमध्ये वाद; उचलले टोकाचे पाऊल..म्हणतेय..

Kurkure craving sparks divorce: Agra woman leaves husband after he forgets to get her ₹5 munchies : कुरकुऱ्यांमुळे संसार घटस्पोटाच्या पायरीवर; बायको रुसली गेली माहेरी आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 12:42 PM2024-05-15T12:42:39+5:302024-05-15T14:02:52+5:30

Kurkure craving sparks divorce: Agra woman leaves husband after he forgets to get her ₹5 munchies : कुरकुऱ्यांमुळे संसार घटस्पोटाच्या पायरीवर; बायको रुसली गेली माहेरी आणि..

Kurkure craving sparks divorce: Agra woman leaves husband after he forgets to get her ₹5 munchies | अरे बापरे! ५ रुपयांच्या कुरकुरेवरून पती-पत्नीमध्ये वाद; उचलले टोकाचे पाऊल..म्हणतेय..

अरे बापरे! ५ रुपयांच्या कुरकुरेवरून पती-पत्नीमध्ये वाद; उचलले टोकाचे पाऊल..म्हणतेय..

आजकाल कोणत्याही शुल्लक करणावरून नवरा - बायकोची भांडणं होत असतात (Social Viral). असे छोटे छोटे वाद इतके टोकाला जातात की, वाद विकोपाला जातो. ज्यामुळे नात्यात दुरावा येतो. नात्यात दुरावा आला की, बऱ्याचदा पार्टनरप्रती असलेलं प्रेम कमी होत जातं. ज्यामुळे बाब घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचते. अशीच एक विचित्र घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे.

एका महिलेने शुल्लक करणावरून नवऱ्याकडे घटस्पोटाची मागणी केली. नवऱ्याने कुरकुरे आणले नाही म्हणून, महिलेने पोलिसात तक्रार केली. नक्की प्रकरण काय घडलं? पाहूयात(Kurkure craving sparks divorce: Agra woman leaves husband after he forgets to get her ₹5 munchies).

कुरकुरे आणले नाही म्हणून घटस्पोट

पती-पत्नीमध्ये अनेक करणावरून भांडणं होतात. पण कधी भांडणाचं कारण ५ रुपयाचं कुरकुरे ठरलं आहे, असं कधी तुम्ही ऐकलं आहे का? ५ रुपयाच्या कुरकुऱ्याचा वाद इतका टोकाला जाऊन  पोहचला की, प्रकरण लग्न मोडण्यापर्यंत पोहोचलं.

जास्वंदाला येतील लालचुटूक फुलंच फुलं, कुंडीतल्या मातीत मिसळा '१०' रुपयाची गोष्ट-जास्वंदाला येईल बहर

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील शाहगंज येथील ही घटना. एका तरुणीचं लग्न २०२३ साली शाहगंज येथील तरुणासोबत झालं होतं. लग्नानंतर पत्नीने पतीकडे कुरकुरे मागितले होते. पण पतीने तिला कुरकुरे आणून दिले नाही. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडण इतकं टोकाला गेलं की, पतीने पत्नीला मारहाणही केली. यामुळे संतापलेली पत्नी पतीचं घर सोडून माहेरी निघून गेली. नंतर पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

नवऱ्याचं पत्नीला समजवण्याचा प्रयत्न

पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवलं. यानंतर नवरा आणि बायकोला कुटुंब समुपदेशन केंद्रात बोलावण्यात आलं. समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी या दोघांचं समुपदेशन केलं. शिवाय दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

पतीच्या वागणुकीत बदल, पत्नीचा आरोप

समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी सांगितलं की, 'एका वर्षापूर्वी तरुणीचे शाहगंज पोलीस स्टेशन हद्दीत लग्न झाले होते. पती चांदीचा कारागीर आहे. लग्नाआधीपासूनच तिला कुरकुरे खायला आवडत होते. लग्नानंतर पतीने पत्नीची पुरेपूर काळजी घेतली. लाड पुरवले. पण, आता त्याची वागणूक बदलली असल्याचा आरोप बायकोने केला आहे.'

हात-पाय-मान-कोपरे काळवंडले? चमचाभर हळदीचा सोपा उपाय- टॅनिंग होईल गायब; त्वचा चमकेल

पत्नीला रोज जंक खाण्याची सवयी

'पत्नीला रोज कुरकुरे खाण्याची सवय होती. जंक स्नॅक खाण्याच्या तिच्या सवयीमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली होती. या सवयीमुळे अनेकदा घरात वाद व्हायचे. जंक स्नॅक खाण्याच्या तिच्या सवयीमुळे मला तिच्या आरोग्याची चिंता वाटू लागली. यानंतर भांडणामुळे पत्नी माहेरी निघून गेली.' असं पतीनं सांगितलं. 

Web Title: Kurkure craving sparks divorce: Agra woman leaves husband after he forgets to get her ₹5 munchies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.