Join us

मणिपूरच्या लेकीनं घडवला इतिहास, बर्लिनमध्ये देशाला मिळवून दिलं पहिलं जुदो गोल्ड मेडल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:25 IST

Linthoi Chanambam : लिनथोई चनंबमनं बर्लिन ज्यूनिअर यूरोपीय कप २०२५ मध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला आहे. ती भारतातील पहिली जुदोका बनली आहे. 

Linthoi Chanambam : "अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है"...शाहरूख खानच्या 'ओम शांती ओम' सिनेमातील हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. हा डायलॉग अनेकांच्या जीवनात खरा उतरत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. म्हणजे जे मेहनत करतात, जिद्दीने एखादी गोष्टी मिळण्याच्या मागे लागतात त्यांना यश नक्कीच मिळतं. असंच काहीसं म्हणता येईल मणिपूरच्या लिनथोईबाबत. लिनथोई चनंबमनं (Linthoi Chanambam) बर्लिन ज्यूनिअर यूरोपीय कप २०२५ (berlin junior european cup 2025) मध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला आहे. ती भारतातील पहिली जूडोका बनली आहे. 

मणिपूरच्या या १८ वर्षीय खेळाडूनं इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टच्या बॅनरखाली स्पर्धेत भाग घेत महिलांच्या ६३ क्रिगा श्रेणीत अव्वल नंबर मिळवला आहे. बर्लिनच्या या स्पर्धेत ३७ देशातील ६१८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. लिनथोईनं एक एक करत सगळ्यात प्रतिस्पर्धकांना मात दिली आणि गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला. तिचा फायनल मुकाबला पोलिश जूडोका सोबत झाला होता.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लिनथोईचे वडील मासेमारी करून घर चालवतात. त्याहून महत्वाची बाब म्हणजे लिनथोई तिच्या वडिलांना मासे पकडण्यास बालपणापासून मदत करते आणि विकण्यासही मदत करते. लिनथोईसाठी तिचे वडिलच तिचे सगळ्यात मोठे सपोर्टर आहेत. 

पोरितोषिक समारोहात लिनथोई म्हणाली की, "हा विजय तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे". लिनथोईनं २०२२ मध्ये बॅंकॉकमध्ये झालेल्या आशियाई कॅडेट आणि ज्यूनिअर चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल, २०१८ मध्ये सब-ज्यूनिअर नॅशनलमध्ये किताब आणि चंडीगढमध्ये २०२१ मध्ये ज्यूनिअर नॅशनलमध्ये विजय मिळवला होता. 

लिनथोई मणिपूरच्या मायांग इंफालमध्ये आठ वर्षांची असताना पासून जूडोचा सराव करत आहे. इतक्या वर्षांची तिची मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचं फळ तिला मिळालं. आज तिनं या खेळात भारताला पहिलं मेडल मिळवून देत देशाना मान वाढवला आहे. तसेच स्वत:ही भारतातील पहिली गोल्ड मेडल मिळवणारी महिला जूडोका ठरली आहे. लिनथोईला तिच्या या यशासाठी खूप खूप अभिनंदन!

टॅग्स :जरा हटकेसोशल व्हायरल