Join us

लग्नात नाचताना उत्साहात बायकोला उचलायला गेला अन् स्वत:च दणकन आपटला व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 15:52 IST

Man lifting the woman in his lap on dance floor : हिरोगिरी चांगलीच अंगाशी आली! लग्नात नाचताना बायकोला उचलायला गेला अन् दणकन आदळला, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

लग्न समारंभात  लोक मनसोक्त नाचतात. मुलाकडचे असो किंवा मुलीकडेच लग्न समारंभात सगळेच आनंदानं  नाचतात. अशात एकमेकांच्या डान्स स्टेप्स पाहून काहीजण नाचण्याचा प्रयत्न करतात. (Man lifting the woman in his lap on dance floor fell down badly internet loves this funny viral video)  

ज्या लोकांना अजिबात डान्स येत नाही असेही काहीजण सगळ्यांबरोबर ठेका धरतात. यादरम्यान अनेक गमती जमती झालेल्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत  अस काही घडलं जे पाहून नेटिझन्सना हसू अनावर झालं आहे.

दोन जोडपी डान्स फ्लोअरवर नाचत असतात. यावेळी एक माणूस रोमॅन्टीक मूडमध्ये येऊन डान्स करू लागतो. यावेळी तो आपल्या पार्टनरला उचलून नाचण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा हा प्रयत्न फसतो. तो ज्यावेळी पत्नीला घऊन पडतो त्यावेळी काही कळायच्या आतच त्याचा तोल जातो आणि तो दणकन आदळतो. यावेळी उपस्थित सर्वच लोक हे दृश्य पाहून हसायला लागतात.

'पापा सारा दिन भुखे रेहते है...' वडिलांच्या काळजीनं लेकीला कोसळलं रडू; व्हिडिओ पाहून भावूक व्हाल 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. @HasnaZarooriHai या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  लोक या कपल डान्सवर खूप कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि तर एका युजरनं सरावाशिवाय आखाड्यात उतरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं हिरो बनायची काय गरज होती असं म्हटलंय.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया