थंडीच्या दिवसांत बाजारात ताज्या, हिरव्या आणि पोषक पालेभाज्या भरपूर प्रमाणांत विकायला ठेवलेल्या असतात. मेथी, पालक, चवळी, सरसों यांसारख्या हिरव्यागार भाज्यांपासून घराघरात विविध चविष्ट पदार्थ हमखास तयार केले जातात. विशेषतः पंजाबची खासियत असलेली ‘सरसो का साग’ ही रेसिपी हिवाळ्यात खूपच लोकप्रिय असते. मात्र अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे, ज्यामध्ये सरसो का साग तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी चक्क ड्रिल मशीनचा वापर करण्यात आला आहे(man cooking sarso ka saag with drill machine).
हा अनोखा आणि आश्चर्यचकित प्रयोग पाहून अनेकजण थक्क झाले असून, काहींनी त्याचे कौतुक केले तर काहींनी टीका केली आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये आणि हा व्हिडीओ एवढा व्हायरल, होण्यामागचे (drill machine cooking hack) मुख्य कारण काय आहे ते पाहूयात.
या व्हायरल व्हिडिओत नेमकं झालं तरी काय ?
kajalvaishnav या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरव्यागार पालेभाज्या भरपूर प्रमाणात विकायला ठेवलेल्या असतात. त्यातही पंजाबची खासियत असलेल्या 'सरसो का साग'ची चव चाखण्यासाठी खवय्ये आतुर असतात. ही रेसिपी बनवण्यासाठी भाज्या व्यवस्थित मॅश करणे ही सर्वात कठीण आणि फार मेहेनतीची प्रक्रिया असते. पण एका पठ्ठ्याने हे कष्ट वाचवण्यासाठी चक्क 'ड्रिल मशीन'चाच वापर केला आहे, आणि त्याच्या याच भन्नाट ट्रिकचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे.
स्पेशल पंजाबची खासियत असलेले 'सरसो का साग' तयार करण्यासाठी तासंतास लाकडी रवीने भाजी घोटली जाते, जेणेकरून ती एकजीव होईल. मात्र, एका व्हायरल व्हिडिओने या पारंपरिक पद्धतीला एक हटके ट्विस्ट दिला आहे. या व्यक्तीने चक्क ड्रिल मशीनला रवी जोडून काही मिनिटांतच 'साग' तयार करून दाखवले आहे. मशीन चालू करताच काही सेकंदातच ती संपूर्ण भाजी लोण्यासारखी मऊ आणि एकजीव होताना दिसत आहे. भन्नाट डोकं चालवणारा हा 'जुगाडू' आचारी सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला असून, हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!"
'सरसो का साग' हे नाव ऐकलं तरी भूक लागते. पण ही रेसिपी जितकी चविष्ट असते, तितकीच ती तयार करायला देखील फार मेहनत लागते. ही मेहनत वाचवण्यासाठी चक्क घराच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या ड्रिल मशीनने भाजी एकजीव करण्याचा हा व्हिडिओ पाहून प्रोफेशनल शेफही अवाक झाले आहेत. ड्रिल मशीनच्या खालच्या भागात लाकडी रवी जोडली आहे आणि अशा ड्रिल मशीनने चक्क सरसो का साग ५ मिनिटांत मॅश करून दाखवले आहे.
हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. काहींनी याला 'इंजिनिअरिंगचा स्वॅग' म्हटलं आहे, तर काहींनी "कष्टापेक्षा डोकं चालवलेलं बरं" अशा कमेंट्स केल्या आहेत. काही जुन्या जाणत्या खवय्यांनी मात्र नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, "जी चव हाताने रवीने घोटलेल्या भाजीत येते, ती मशीनने बनवलेल्या भाजीत येणार नाही."
ऐन चाळिशीत कँसर होण्याची ५ प्रमुख कारणं! दिवसभरात करताय 'या' चुका - दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात...
आतापर्यंत तो ७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच २३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाईक केले असून अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी “हा जुगाड तर कमाल आहे” अशी प्रतिक्रिया दिली, तर काहींनी “असं किचनमध्ये करणे धोकादायक ठरू शकते” असे मत व्यक्त केले आहे. अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये हसणाऱ्या इमोजींचा पाऊस पाडला आहे.
एकूणच, हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा हेच सिद्ध झाले आहे की जुगाडच्या बाबतीत भारतीयांचा हात कुणीही धरू शकत नाही.
