मलाला युसूफझाई. या पाकिस्तानी मुलीचं नाव कुणाला माहिती नाही? वयाच्या ११ व्या वर्षी तिने बीबीसीसाठी 'गुल मकई' या नावाने ब्लॉग लिहून तालिबानच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला होता. (Malala Yousafzai's love story, nobel prize winner girl and her story )आणि पुढे त्यांनीच तिला गोळ्या घातल्या. आता मलाला मोठी झाली, प्रेमात पडली तिनं लग्नही केलं. पण ती म्हणते बराच काळ मी माझं हे नातं लपवून ठेवलं होतं, असं का केलं असेल तिनं?
२०१२ साली तिच्यावर झालेल्या हल्ल्याने जग हादरले होते. शाळेतून परत येत असताना तालिबानींनी तिच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या गेल्या. पण तिचा जीव वाचला. उपचारानंतर पुढे ती इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थायिक झाली. २०१४ साली केवळ १७ वर्षांची असताना तिला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. मलालाने 'Malala Fund' या संस्थेद्वारे जगभरातील मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी काम सुरु केले.
अलीकडेच तिचे पुस्तक 'Finding My Way' प्रकाशित झाले. या पुस्तकात मलालाने केवळ तिच्या सामाजिक कार्याची नव्हे तर वैयक्तिक आयुष्याचीही प्रामाणिकपणे मांडणी केली आहे. या पुस्तकात तिने तिच्या पती असर मलिक यांच्याशी झालेल्या प्रेम विवाहाची कथा सांगितली आहे. ती म्हणते, कॉलेजमध्ये शिकत असताना असरला भेटताच मी त्याच्या प्रेमात पडले होते. पण तेव्हा जगभरातली माध्यमं माझ्या मागे होती, खूप चर्चा झाली असती म्हणून मी प्रेमात पडल्याचंच कुणाला सांगितलं नाही. तसा तिला वडिलांचा धाक होता. प्रेमात पडल्याचं सांगितलं तर घरच्यांचा विरोध असणारच होता याची खात्री असल्याने घरीही तिनं काही सांगितलं नाही.
पुस्तकात ती एक मजेशीर प्रसंग सांगते, एका डेटवर ती साध्या कपड्यांत गेली होती, पण तिथे पोहोचल्यावर तिने थोडा वेगळा पोशाख केला आणि असरने तिच्या रुपाचे कौतुक केले. सलवार कमिजमध्ये रोज दिसणारी मलाला गुलाबी वनपिसमध्ये सेक्स बॉम्ब दिसते अशी असरने म्हटल्यावर मलालाला भलताच आनंद झाल्याचे तिने सांगितले. तिच्या नजरेत असर हा तिचा मित्र, आधार आणि तिच्या जीवनातील समतोल राखणारा सहचरी आहे.
अर्थात सोपं नव्हतंच तिनं हे नातं जगजाहीर करणं, तिच्या घरच्यांनाही ते मान्य होणं. पण ते सारं त्या दोघांनी निभावलं आणि २०२१ मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नात आलेल्या अडचणींविषयी तिनं या पुस्तकात काही मोकळेपणानं सांगितलं आहे.