मलायका अरोरा ही केवळ ग्लॅमर आणि फिटनेससाठी ओळखली जाणारी सेलिब्रिटी नाही, तर ती लग्न, नाती आणि महिलांसंदर्भातील विषय यासंबंधातही ठामपणे बोलते. कोणाला तिचं बोलणं पटतं तर कोणाला टोकाचं वाटतं. (Malaika Arora says If you can't stay happy together in as a couple then get a divorce because....)मात्र पॉडकास्ट किंवा मुलाखतींत कायम ती विविध विषयांवर बोलताना दिसते. स्वतःचे अनुभव आणि विचार अगदी स्पष्ट शब्दांत मांडते. 'मुव्हींग इन विथ मलायका' या सिरिजमध्ये मलायकाने मांडलेले विचार सध्या चर्चेत आहेत.
मलायका म्हणजे, लग्न म्हणजे स्त्रीने स्वत:ची ओळख विसरुन दुसऱ्याच्या आयुष्यात सामावून घेणं नाही. लग्न झालं तरी स्त्रीची स्वतःची ओळख, करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्य टिकून राहायलाच हवं. महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत, स्वतःचं बँक अकाउंट, स्वतःची ओळख आणि स्वतःचं आयुष्य असावं. नातं म्हणजे आधार असते, बंधन नाही.
स्वतःच्या घटस्फोटाच्या निर्णयाबाबतही मलायका म्हणते, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यावं, नातं सुखद नसेल तर समाजाच्या दबावाखाली रेटत राहू नये. 'लोक काय म्हणतील' या भीतीमुळे अनेक स्त्रिया दु:खी नात्यांमध्ये अडकून राहतात, आणि ही मानसिकता बदलायला हवी.
महिलांनी घाईनं लग्न न करता आधी स्वतःला ओळखावं, आयुष्य अनुभवावं, करिअरमध्ये स्थिर व्हावं, आणि मगच मोठे निर्णय घ्यावेत, समाधानी असलेली स्त्रीच नात्यांमध्येही समतोल राखू शकते. मन मारुन फक्त समाजाच्या दबावाखाली चालणारे नाते कोणालाच आनंदी ठेवत नाही. त्यामुळे लग्नाच्या नात्यात गडबड असेल, घटस्फोट घ्यायचा असेल तर तो ही अत्यंत मॅच्युरिटी आणि डिग्निटीने घ्यायला हवा. चारचौघात तमाशे न करता शांतपणे वेगळं व्हावं. बाई म्हणून तुम्ही काय आहात याची लोकांनी वाटलेली सर्टिफिकिट्स घेत बसू नका, डिग्निटी सांभाळा..
